जाहिरात

Raigad Rain: रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले! म्हसळा ते श्रीवर्धन हरिहरेश्वरकडे जाणारा मार्ग बंद

दरम्यान रायगडसह संपूर्ण कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

Raigad Rain: रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले! म्हसळा ते श्रीवर्धन  हरिहरेश्वरकडे जाणारा मार्ग बंद
रायगड:

मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात झाले आहे. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी जोरादार पाऊस होत आहे. कोकणात तर पावसाची पहिल्या दिवसापासून नेहमी प्रमाणे जोरदार बॅटींग सुरू आहे. तळ कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत ही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर रायगडमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. पावसाचा सर्वाधीक फटका हा श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्याला बसल्याचं ही समोर येत आहे. इथले मार्ग सध्या बंद करण्यात आले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रविवार पासून संपूर्ण रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. श्रीवर्धन तालुक्याला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. या मुळेच नदी नाल्याच्या पाण्याला अडथळा आल्याने तालुक्यातील सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक मार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे. माणगाव ते श्रीवर्धन जाणाऱ्या मार्गावरील म्हसळा येथून श्रीवर्धनकडे पुढे जाताना श्रीवर्धन पासून 3 किलोमीटर अलीकडून श्रीवर्धन व हरिहरेश्वर कडे जाणाऱ्या फाट्यावर मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Maharashtra Rain : नागरिकांनो घरातच थांबा, मुंबईसह 'या' 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

या मुळे ता भागातील रस्ता पाण्याखाली गेल्याने हरिहरेश्वरकडे व श्रीवर्धन कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या ठिकाणी रस्त्याच्या आजू बाजूला अनेक बांधकामे झाली आहेत. त्यांनी केलेल्या माती भरावमुळे पावसाळी नाल्यामधून आलेले पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. याचा त्रास श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील या महत्वाच्या राज्यमार्गाला बसून वाहतूक ठप्प होते असल्याची नागरिकांमधुन बोलले जाते. आता हा मार्ग काही वेळासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे. शिवाय नागरिकांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Live Update :  मुंबईसह 'या' 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट

दरम्यान रायगडसह संपूर्ण कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी सिंधुदूर्गमध्ये ही पावसामुळे काही ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली आहे. काही गावांचा संपर्क ही तुटला आहे. सरकारकडून खबरदारीचे उपाय सुचवण्यात आले आहेत. कामा शिवाय बाहेर पडू नका असे ही आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी कोकण आणि मुंबईत पावसाने जोरादार बॅटींग सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईतही चाकरमान्यांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com