Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: 'आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला'; उद्धव ठाकरेंचाही फडणवीसांवर निशाणा

Raj Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान मोठे संकेत दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Uddhav Thackeray and Raj Thackeray: ठाकरे बंधू स्टेजवर येताच त्यांनी हातात हात घालून उपस्थितांना अभिवादन केलं

Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: 20 वर्षांनी एकत्र आल्यानंतर ठाकरे बंधू काय बोलणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनीही भाषणाला सुरुवातीला नाव न घेता फडणवीसांवर टोला लगावला. यावेळी ते म्हणाले, बऱ्या वर्षांनी राज आणि माझी भेट व्यासपीठावर (Uddhav Thackeray Big statement) झाली. आता पंचाईत अशी आहे, त्याने मला सन्मामनीय उद्धव ठाकरे म्हटलं आहे. मग साहजिकच आहे, त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांना पाहिलं आहे. त्यामुळे मी देखील देखील माझ्या भाषणाची सुरुवात सन्माननीय राज ठाकरे अशी करतो. 

अप्रतिम मांडणी राजने केली आहे. माझ्या भाषणाची आवश्यकता आहे मला वाटत नाही. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर आमच्या भाषणाकडे आहे. आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम मी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून सर्वांचे आभार मानतो. आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Uddhav Thackeray : 'कोणाच्याही लग्नात भाजपवाल्यांना बोलवू नका, श्रीखंड, बासुंदी खातील अन्....'; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने सभागृहात हशा

सुशील केडियावही संतापले...

मराठी बोलणार (Marathi Language Controversy) नसल्याचं वक्तव्य करणारे गुंतवणूक सुशील केडिया यावरही उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, तो भेडिया का कोण, ही सगळी त्यांची पिलावळ आहे. ते म्हणतात शिवसेनेने आजवर काय केलं ? राज मी तुला सोबत घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र आलो आहोत. ते म्हणतात मराठी माणूस आम्ही मुंबईबाहेर नेला. मराठी माणूस मुंबईबाहेर नेला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मुंबई महाराष्ट्राचे लचके तोडले, त्याचे काय? व्यवसाय, उद्योगधंदे पळवले त्याचे काय ? आपली ताकद ही आपल्या एकजुटीत असली पाहीजे. दरवेळी संकट आलं की आपण मराठी एकटतो, आणि संकट गेलं की आपापसात भांडायला लागतो. असा नतद्रष्टपणा आता करायचा नाहीये. 

Advertisement