Rajya Sabha MP : राज्यसभेतील खासदारकी कुणाला? पार्थ की जय पवार, बारामतीकरांच्या मनात कोण?

अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उपथापालथ पाहायला मिळत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उपथापालथ पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यसभेतील त्यांच्या रिक्त पदावर कोणाची वर्णी लागणार, यावरुन पार्थ पवार विरुद्ध जय पवार असं चित्र तयार झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना राज्यसभेत पाठवलं जाऊ शकतं. दुसरीकडे भाजप पार्थ पवार यांच्या नावास पाठिंबा देण्यास तयार नाही. जय पवार यांच्या नावावर सहमती आहे, पण पार्थ पवार यांच्या नावाला भाजपाचा विरोध आहे, असल्याचे सूत्रांनी सांगितलंय. 

पार्थ पवारांवर पुणे भूखंड घोटाळ्याचे आरोप...

बारामतीकर मात्र याबाबत पार्थ पवारांना पाठिंबा देत असल्याचं दिसून येत आहे. राज्यसभेच्या रिक्त खासदारकीच्या जागेसाठी पार्थ दादा योग्य उमेदवार असून सुनेत्रा वहिनींना त्यांना संधी द्यावी अशी विनंती बारामतीकरांकडून व्यक्त केली जात आहे. पार्थ पवारांवर पुणे भूखंड घोटाळ्याचे खोटे आरोप केले जात असून त्यात तथ्य नाही.  

नक्की वाचा - Parth Pawar News: अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांना राज्यसभेत पाठवण्यासाठी भाजपाचा विरोध? पुण्यातील ही गोष्ट भोवली?

    पार्थ पवार पॉवरफूल

    भाजप याचं भांडवल करतंय. ही पक्षांतर्गत बाब असून भाजपने यात ढवळाढवळ करू नये. पार्थ पवारांना अनुभव आहे. ते दुसरे दादाच आहेत. दुसऱ्या एका बारामतीकराने म्हटलं, आरोप करणं आणि आरोप सिद्ध होणं याच फरक आहे. पार्थ पवार पॉवरफूल आहेत.  त्यांना राजकीय अनुभव आहे. पॉवरफुल माणसाला विरोध होतो. ते पक्ष वाढवतील, पक्ष पुढे नेतील याची  कोणाला तरी भीती निर्माण होतोय. पार्थ पवार म्हणजे अजितदादांची प्रतिकृती, पार्थ पवारांनाच राज्यसभेवर संधी द्या बारामतीकरांची भावना आहे. 

    Topics mentioned in this article