First Aadhaar card holder Ranjana Sonawane : मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरू करण्यात आल्याने लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला मोठा लाभ झाल्याचं सांगितलं जात आहे. लाडक्या बहिणींनी निवडून दिल्यानं स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत बोलून दाखवलं आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सरसकट दिल्या जाणाऱ्या लाभामध्ये छाननी करण्यात येत आहे. त्यामुळे लाभ घेणाऱ्या लाडक्यी बहिणींच्या संख्येत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान लाडकी बहीण योजना सुरू होऊनही तब्बल नऊ महिन्यात मूळच्या नंदूरबारच्या असलेल्या देशातील पहिल्या आधारकार्ड धारक रंजना सोनवणे यांना अद्यापही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नव्हता. तब्बल 9 महिन्यांनंतर त्यांचा नंबर लागला आहे. सोनावणे यांनी योजनसाठी ‘नारी शक्ती दूत' अॅपच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकेमार्फत नोंदणी केली होती. त्यासाठी त्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक (बँक ऑफ इंडिया, लोणखेडा शाखा) व इतर आवश्यक कागदपत्रे सादर केली होती.
देशात सर्वात आधी ज्या महिलेला आधारकार्ड मिळालं त्यांना तब्बल 9 महिन्यांनंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला. धक्कादायक बाब म्हणजे नंदूरबारमध्ये राहणाऱ्या रंजना सोनवणे यांना गॅस कनेक्शन मिळण्यासाठीही 7 वर्षे लागली होती, अशी माहिती आहे.
नक्की वाचा - Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले का? 'या' पद्धतीनं करा चेक
मात्र तरीही त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणीची रक्कम जमा होत नव्हती. पुढील चौकशीत, त्यांचे आधार कार्ड हे अंधेरी येथील आयडीबीआय बँकेशी संलग्न असून, त्यामुळे लाभाची रक्कम त्या खात्यात जमा झाली होती, असं सांगितलं जात आहे. यासंदर्भात बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकेतील खात्यांची पडताळणी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनीही कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे सोनवणे यांचे पोस्टात खाते सुरू करण्यात आले असून पुढील महिन्यापासून त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळेल अशी आशा आहे. याआधीचे पैसे देखील संबंधीत बॅकेतून त्यांना देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. रंजना सोनवणे या देशातील पहिल्या आधार धारक असून त्या नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील टेंभली गावच्या रहिवाशी असून त्या मोलमजुरी करुन आपला गुजारा करतात.