जाहिरात

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले का? 'या' पद्धतीनं करा चेक

Ladki Bahin Scheme : महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या एप्रिल महिन्याचा हप्ता दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होईल, अशी घोषणा केली आहे. त्यानुसार या योजनेचे पैसे मिळण्यास आता सुरुवात झाली आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले का? 'या' पद्धतीनं करा चेक
मुंबई:

Ladki Bahin Scheme : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'  ही महायुती सरकारमधील सर्वात महत्त्वकांक्षी आणि चर्चेत असलेली योजना आहे. या योजनेनुसार राज्यातील  21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांसाठी दर महिना 1500 रुपये जमा होतात. विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मिळवलेल्या यशात या योजनेचा मोठा वाटा आहे. या योजनेची रक्कम 2100 करणार असल्याचं आश्वासन महायुतीनं जाहिरनाम्यात दिलं होतं. पण, अजून ही रक्कम वाढवण्यात आलेली नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या एप्रिल महिन्याचा हप्ता दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होईल, अशी घोषणा केली आहे. त्यानुसार या योजनेचे पैसे मिळण्यास आता सुरुवात झाली आहे. तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर या योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कसे जमा होतील, हे कसं चेक करावं याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्ही काही सोप्या पद्धतीनं लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही? हे चेक करु शकता

ऑनलाईन बँकिंग : ज्या बँकेच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात, त्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. अथवा तुमच्या मोबाईलमध्ये त्याचे अ‍ॅप डाऊनलोड असेल तर तिथे जाऊन चेक करा. त्या ठिकाणी तुम्हाला हे पैसे जमा झाले की नाही हे निश्चित समजेल.

( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे )
 

मोबाईल एसएमस : सध्या बहुतेक ग्राहकांचे मोबाईल क्रमांक हे बँकेच्या खात्याशी जोडलेले असतात. त्या मोबाईल क्रमांकावर तुमच्या खात्यामधील व्यवहाराचे सर्व अपडेट मिळतात. 'लाडकी बहीण योजनेचे' पैसे जमा झाल्यानंतर तुम्हाला बँकेकडून मोबाईलवर एसएमसच्या माध्यमातून चेक करता येईल.

फोन बँकिंग : बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन केल्यानंतरही तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा झाली त्याची माहिती मिळते. या माध्यमातूनही तुम्ही पैसे जमा झाले की नाही याची खात्री करु शकता.

( नक्की वाचा : Ladki Bahin Scheme : किती बहिणींना झाला फायदा, सरकारचे किती पैसे खर्च? पहिल्यांदाच आकडा उघड! )
 

प्रत्यक्ष बँकेत जा : बँकेमध्ये प्रत्यक्ष जाऊन तुम्ही तेथील अधिकाऱ्याशी संपर्क साधून किती रक्कम जमा झाली हे तपासू शकता.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: