'माझ्या जागेवर दुसरीला आणलं', रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत ओक्साबोक्शी रडल्या...

रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या पती आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins
छत्रपती संभाजीनगर:

कन्नड विधानसभा मतदारसंघातील (Kannada Assembly Constituency) महायुतीच्या उमेदवार आणि रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्या पती आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. 

रविवारी त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात एका रॅलीला संबोधित केलं. यादरम्यान त्या भावुक झाल्या आणि रडू लागल्या. त्यांनी पती हर्षवर्धन जाधव यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाषणादरम्यान त्या म्हणाल्या, पतीने माझ्यावर अन्याय केलाय. मात्र तरीही मी सर्व सहन केलं.  मी असताना देखील आणखी दुसरीला घरात आणलं असं देखील संजना जाधव यावेळी म्हणाल्या.

नक्की वाचा - प्रचाराच्या शेवटच्या दिवशी धक्कादायक बातमी; करवीरचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला

त्या पुढे म्हणाल्या, रावसाहेब दानवे केवळ यासाठी गप्प राहिले कारण ते एका मुलीचे वडील आहेत. हर्षवर्धन जाधव याच्याशी लग्न केल्यानंतर मला अत्यंत त्रास झाला. मी लग्न केल्याच्या एका महिन्यात पुन्हा माहेरी आले. जेव्हा मी माझ्या वडिलांना याबाबत सांगितलं तर ते म्हणाले, एक मूल होऊ देत मग तो सुधारेल. एक मूल झाल्यानंतर माझे वडील म्हणाले की, वयाच्या चाळीशीत पोहोचल्यावर माणसांमध्ये चांगलं बदल होतात, ते सुधारतात. आता मी चाळीशीत आहे. मात्र या काळात मला खूप त्रास सहन करावा लागला. तो घरात दुसऱ्या महिलेला घेऊन आला होता, असं सांगताना त्या स्टेजवर ढसाढसा रडू लागल्या.

नक्की वाचा - 'लुटली तिजोरी, केलीय गद्दारी, आता... 'उद्धव ठाकरेंनी सभा गाजवली, मोदी- शहांवर हल्लाबोल

इशा झा यांचा व्हिडिओ झाला होता व्हायरल..
माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि इशा झा यांच्यामध्ये संबंध असल्याची चर्चा सुरू होती. काही महिन्यांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. यात काही काळ ते इशा झा यांच्यासोबत असल्याचं मान्य केलं होतं. मात्र काही कारणास्तव दोघांमधील संबंध बिघडल्यानंतर आमच्यातील संबंध संपल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितलं होतं. 

Advertisement