Crime News : वर्क फ्रॉम होमच आमिष, टेलिग्रॅमवर महिलेची 2.29 लाखांची फसवणूक

संगमेश्वर तालुक्यातील गोळवली-बौद्धवाडीमधील एका महिलेला 'वर्क फ्रॉम होम' देण्याचं आमिष दाखवून सायबर भामट्यांनी तिची तब्बल २ लाख २९ हजार 132 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली-बौद्धवाडीमधील एका महिलेला 'वर्क फ्रॉम होम' देण्याचं आमिष दाखवून सायबर भामट्यांनी तिची तब्बल 2 लाख 29 हजार 132 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निता प्रेमदास गमरे यांना टेलिग्राम अॅप्लिकेशनवर 'वंशिका' नावाच्या अकाउंटवरून 'वर्क फ्रॉम होम' करण्याबाबत मेसेज आला होता. त्यांनी या ऑफरला होकार दिल्यानंतर कस्टमर सपोर्ट नावाच्या टेलिग्राम ग्रुपमधील हिना, निखिल पाटील (ओनर), विघ्नेश (अॅडमिन) आणि टाटा क्लिक कंपनीचे सीनियर प्रमोटर म्हणून सांगण्यात आलेले सुमित यांनी त्यांना वेळोवेळी विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले. हे टास्क पूर्ण करण्यासाठी आणि पुढील टास्कसाठी आगाऊ रक्कम भरण्यासही त्यांना सांगितले गेले.

नक्की वाचा - Washim Crime : विवाहबाह्य संबंध, MMS व्हायरल करण्याची धमकी; महिलेने आयुष्यचं संपवलं!

यावेळी फिर्यादी गमरे यांनी त्यांच्या 2 लाख 29 हजार 132 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये भरले. मात्र, पैसे भरुनही त्यांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही. उलट आरोपींनी त्यांना दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी आणखी पैसे भरण्याचा आग्रह केला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गमरे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदवली. ही घटना 23 ते 29 जून 2025 या कालावधीत घडल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

Topics mentioned in this article