
प्रियकराने शारीरिक संबंधाची व्हिडिओ (MMS) व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीपोटी एका 40 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची भयंकर घटना वाशिमच्या कारंजा शहरात घडली आहे. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी दोन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रियकर शेख मोबीन शेख वाजीद आणि त्याचा भाऊ शेख अमीन शेख वाजीद यांच्याविरुद्ध कलम 108, 351(3), 352 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील आरोपी शेख अमीन शेख वाजीद यास अमरावती येथून अटक केली आहे. दुसरा आरोपी फरार आहे. या आरोपीने पीडित महिले सोबत ओळख करून विश्वासात घेत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
नक्की वाचा - 2 पती, 1 प्रियकर, दीर आणि सासऱ्यासोबत संबंध, त्यानंतर सासूची हत्या... क्राईम थ्रिलरपेक्षा कमी नाही महिलेची गोष्ट
धक्कादायक म्हणजे त्यांनी शारीरिक संबंधाचे एमएमएस व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी शारीरिक संबंध करण्यास भाग पाडत होता. याशिवाय पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी पीडितेला दिली होती. या त्रासाला कंटाळून पीडितेने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी कारंजा पोलीस घटनेचा तपास करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world