राकेश गुडेकर, रत्नागिरी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांच्या संबंधित राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचे निर्देश दिले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने देशातील पाकिस्तानींविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या नागरिकांना देश सोडण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने पाकिस्तानी नागरिकांची पडताळणी सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तीन पाकिस्तानी महिला राहत असल्याचं समोर आलं आहे.
तीनपैकी दोन महिला दापोलीत तर मंडणगडमध्ये एक पाकिस्तानी महिला आढळून आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या तिन्ही महिलांचे भारतीय व्यक्तींशी लग्न झालेलं आहे. या तिन्ही महिलांचा लॉन्ग टर्म व्हिसा आहे.
ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: युद्ध झालं तर 'पाक'ड्यांचा फाडशा किती दिवसात? कुणाची सैन्य ताकद किती?
दरम्यान दापोलीत आढळलेल्या दोन पाकिस्तानी महिलांमध्ये उरुसा चिकटे ही कराचीमधील असून त्यांनी शहानवाज बटे यांच्याशी विवाह केला आहे. तर आशिया बानू हाजी अन्वर अकबानी या हर्णे येथे पतीसोबत वास्तव्यास आहेत. आता या तीन महिलांना पाकिस्तानात जावं लागणार का हे पाहावं लागणार आहे.
(नक्की वाचा- Pahalgam attack: 'भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा दावा खोटा' मोठ्या नेत्याचा मोठा आरोप, भाजपचं टेन्शन वाढणार?)
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना दिलेल्या सर्व वैध्य व्हिजा 27 एप्रिलपासून रद्द मानले जातील. याशिवाय, पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे वैद्यकीय व्हिसा फक्त 29 एप्रिलपर्यंत वैध असतील. अशा परिस्थितीत, भारतात उपस्थित असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब पाकिस्तानात परत जाण्यास सांगण्यात आले आहे.