जाहिरात

Veda Sarfare: रत्नागिरीच्या वेदाने रचला इतिहास! दीड वर्षांच्या चिमुकलीचा रेकॉर्ड, देशात नाव उंचावलं

Veda Sarfare Record: आता तिने देशात रत्नागिरीचे नाव उंचावले असून भारताची सर्वात लहान जलतरणपटू म्हणून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. 

Veda Sarfare: रत्नागिरीच्या वेदाने रचला इतिहास! दीड वर्षांच्या चिमुकलीचा रेकॉर्ड, देशात नाव उंचावलं

राकेश गुडेकर, रत्नागिरी:

Veda Sarfare Indian Book Of Records: बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात. रत्नागिरीच्या दीड वर्षांच्या वेदाने हे वाक्य खरं करुन दाखवलं आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात वेदा सरफरेने 9 व्या महिन्यातच आपल्या कलेची चुणूक दाखवली. आता तिने देशात रत्नागिरीचे नाव उंचावले असून भारताची सर्वात लहान जलतरणपटू म्हणून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. 

'कोकणची चिमुकली जलपरी...'

कोकणातील रत्नागिरीची वेदा सरफरे या दीड वर्षांच्या चिमुकलीने सर्वात लहान भारतीय जलतरणपटू होण्याचा पराक्रम केला आहे. तिची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. वेदा 9 महिन्याची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला शिकली. आता तिने अवघ्या १ वर्ष ९ महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत यशस्वी झेप घेतली आहे.

Teachers Protest: राज्यातील शाळा बंद! शिक्षकांच्या संपावर प्रशासनाचा कठोर निर्णय, परिपत्रक काढले...

वेदाने 100 मीटरचे अंतर 10 मिनिटे आणि 8 सेंकदात पूर्ण करत विक्रमाला गवसणी घातली आहे. नऊ महिन्याची ही चिमुरडी खरं तर तिचं ते रडण्याचं वय. पण ती त्या वयात रडणं विसरून पोहणं शिकतं होती. वेदाचा मोठा भाऊ शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो. तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे.

इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव

रूद्रला घेऊन त्याची आई पायल सरफरे शासकीय जलतरण तलावावर येत होती, त्यावेळी वेदाही जलतरण तलावातील पोहणं पहायची. एक दिवस प्रशिक्षक महेश मिलके यांनी वेदाला पाण्यात सोडलं तेव्हा ती रडली नाही तर पाण्यावर हातपाय मारून तिने पाण्याशी दोस्तीच केली. हळूहळू ती पोहायला लागली. बघता बघता ती पोहण्यात पारंगत झाली. आता तिने थेट नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. जलतरण तलावाच्या कठड्यावरून पाण्यात डोकावताना तिचा आत्मविश्वास दिसून येतो.

Kalyan News : हद्द झाली! कल्याणमध्ये गावगुंड आणि नशेखोरांचे 'राज'; दुकानदार,पत्नीला मारहाणीचा थरार

Listen to the latest songs, only on JioSaavn.com