रिलेटिव इंपोटेन्सी म्हणजे काय? त्या आधारे लग्न रद्द; मुंबई न्यायालयाच्या निर्णयाची चर्चा 

ज्या नात्यात दोघे मानसिक, भावनिक आणि शारिरीकरित्या एकमेकांशी जोडले जाऊ शकत नाही अशा नात्यात राहणं कितपत योग्य? असाही सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका तरुण दाम्पत्याचं लग्न रद्द करण्याचा निर्णय सुनावला. पतीची रिलेटिव इंपोटेन्सी हे यामागील कारण समोर आलं आहे. कोर्टाने सांगितलं की, रिलेटिव इंपोटेन्सीमुळे विवाह कायम राहू शकत नाही, यादरम्यान दाम्पत्याची निराशाही दुर्लक्षित केली जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती विभा कांकणवाडी आणि न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपाठीने 15 एप्रिल रोजी दिलेल्या निर्णयात सांगितलं की, अशा तरुणांना या निर्णयातून मदत मिळेल. 

ज्या नात्यात दोघे मानसिक, भावनिक आणि शारिरीकरित्या एकमेकांशी जोडले जाऊ शकत नाही अशा नात्यात राहणं कितपत योग्य? असाही सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

रिलेटिव इंपोटेन्सी म्हणजे? हा सामान्य नपुंसकतेपेक्षा वेगळा प्रकार आहे. मात्र यामध्ये एखाद्या ठराविक व्यक्तीसोबत शरीर संबंध ठेवण्यात अडथळा होतो. मात्र दुसऱ्या व्यक्तीसोबत ती व्यक्ती शरीर संबंध अडथळ्याशिवाय ठेवू शकते. 

फेब्रुवारी 2024 रोजी कौटुंबिक न्यायालयाने हे प्रकरण फेटाळल्यानंतर 27 वर्षीय व्यक्तीने उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. 26 वर्षीय महिलेने तिचा विवाह रद्द करण्याची मागणी केली होती, मात्र कौटुंबिय न्यायालयाकडे दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली होती. शेवटी महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने  आपल्या निर्णयात सांगितलं की, रिलेटिव इंपोटेन्सी एक सर्वज्ञात स्थिती आहे. ही स्थिती सामान्य नपुंसकतेपेक्षा वेगळी आहे. यामागे अनेक शारिरीक आणि मानसिक कारणं असू शकतात. या प्रकरणात पतीचे आपल्या पत्नीसोबत रिलेटिव इंपोटेन्सी आहे. त्यामुळे पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवता येण्यास सक्षम नसल्याने विवाह कायम ठेवता येऊ शकत नाही. 

यापुढे  न्यायालयाने सांगितलं की, दाम्पत्याच्या कौटुंबिक जीवनातील निराशा दुर्लक्षित केली जाऊ शकत नाही. या व्यक्तीने सुरुवातीच्या काळात शरीर संबंध ठेवण्यात असमर्थतता असल्याने पत्नीला जबाबदार धरलं. कारण आपण असक्षम आहोत, हे स्वीकारणं त्याला कठीण जात होतं. 

Advertisement

हे ही वाचा-'लव्ह जिहादमुळे मुलीची हत्या', काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

लग्नाच्या 17 दिवसांनंतर झाले वेगळे...
दोघांनी मार्च 2023 मध्ये लग्न केलं होतं, मात्र लग्नाच्या 17 दिवसात दोघेही वेगळे झाले. दाम्पत्याने सांगितलं होतं की, त्यांच्यामध्ये शरीर संबंध झाले  नाहीत. यावेळी महिलेने सांगितलं की, तिच्या पतीने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यावेळी त्याने सांगितलं होतं की, ते एकमेकांशी मानसिक, भावनात्मक किंवा शारिरीक जोडला गेला  नाही. तर पतीने दावा केला आहे की, तो पत्नीसोबत शरीर संबंध ठेवू शकला नाही, मात्र त्याच्यात काही दोष नाहीत.