जाहिरात
Story ProgressBack

'लव्ह जिहादमुळे मुलीची हत्या', काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Love Jihad : काँग्रेस नगरसेवकानं आपल्या मुलीची हत्या हा 'लव्ह जिहाद' चा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.

Read Time: 2 min
'लव्ह जिहादमुळे मुलीची हत्या', काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप
कर्नाटक सरकारवर हत्या प्रकरणात टीका होत आहे.

कर्नाटकातील नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येनंतर (Karnataka Murder) काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख पक्षांमध्ये राजकारण तापलंय. हुबळीतील काँग्रेस नेते निरंजन हिरेमठ यांच्या कॉलेजमधील शिकणाऱ्या मुलीची एका माजी विद्यार्थ्यांना हत्या केली. मुलीनं नकार दिल्यानंच ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. 

नेहा हिरेमठ (वय 23) असं या दुर्दैवी मुलीचं नाव असून ती हुबळीच्या कॉलेजमध्ये MCA चं शिक्षण घेत होती. फयाज खोंडूनाईक हे या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. फयाच तिचा वर्गमित्र होता. त्यानं नेहावर चाकूचे अनेक वार केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे. 'माझं नेहासोबत रिलेशन होतं, पण ती गेल्या काही दिवसांपासून टाळत होती,' असा दावा फैयाजनं पोलिसांना दिलेल्या जबानीत केला असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. 

रामनवमीला गालबोट, 'जय श्रीराम' घोषणा दिली म्हणून रॉडनं मारहाण
 

नेहाच्या मृत्यूनंतर कर्नाटकातील सत्तारुढ काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ही एक वैयक्तिक घटना असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. तर भाजपानं राज्यातील कायदा आणि सूव्यवस्थेच्या मुद्यावर सिद्धरामय्या सरकारला लक्ष्य केलंय. केंद्रीय मंत्री आणि धारवाडमधील भाजपा उमेदवार प्रल्हाद जोशी यांनी हा 'लव्ह जिहाद'चा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केलाय. त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडं एका 'विशेष समुदायला' खास वागणूक देणं बंद करावं अशी मागणी केलीय. गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी मात्र यामध्ये अद्याप कोणताही 'लव्ह जिहाद' चा अँगल नसल्याचं स्पष्ट केलंय.   

मुलीची हत्या 'लव्ह जिहाद'

काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी मुलीची हत्या 'लव्ह जिहाद' चा प्रकार असल्याचा आरोप केलाय. 'हे एक मोठं कारस्थान होतं. त्यांनी मुलीला फसवण्याची आणि मारण्याची योजना बनवली होती. ते तिला धमकी देत होते. पण, मुलीनं त्याकडं लक्ष दिलं नाही. माझ्या मुलीसोबत जे झालं ते संपूर्ण राज्य आणि देशानं पाहिलंय. ते हे वैयक्तिक प्रकरण असल्याचं सांगत आहेत. त्यामध्ये वैयक्तिक काय आहे? ते माझे नातेवाईक होते का? ' असा  हिरेमठ यांनी प्रश्न विचारला. 

विद्यार्थ्यांच्या भगव्या ड्रेसवर प्रश्न विचारणं पडलं महाग, जमावाकडून शाळेची तोडफोड
 

केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांनी या प्रकरणात राज्यातील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केलाय. या पक्षाच्या नावाचा अर्थ 'भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि धार्मिक दंगे आहे,' अशी टीका त्यांनी केली. 'मुलांना उच्च शिक्षण मिळावं ही खबरदारी घेणं कोणत्याही सरकारच्या प्रमुखातं कर्तव्य आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये याबाबत जागरुकता आवश्यक आहे. चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होईल हा लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हायला हवा. कर्नाटकात काँग्रेस यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलंय,' असा दावा लेखी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination