जाहिरात

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहंदळे यांचे निधन, शिवचरित्राला नवी ओळख देणारा तपस्वी हरपला

Gajanan Bhaskar Mehendale :  ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले.

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहंदळे यांचे निधन, शिवचरित्राला नवी ओळख देणारा तपस्वी हरपला
Gajanan Bhaskar Mehendale :  औरंगजेबाच्या धार्मिक धोरणांवर त्यांचा एक ग्रंथ लवकरच प्रकाशित होणार होता.
मुंबई:

Gajanan Bhaskar Mehendale :  ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 'श्री राजा शिवछत्रपती' आणि 'Shivaji His Life and Times' यांसारखे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहून शिवचरित्राच्या संशोधनात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

युद्ध पत्रकार ते शिवचरित्रकार

19 डिसेंबर 1947 रोजी जन्मलेल्या मेहेंदळे यांना लहानपणापासूनच इतिहासाची आवड होती. 1969 साली त्यांनी पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळात प्रवेश करून अभ्यासाला सुरुवात केली. याच काळात त्यांना युद्धशास्त्राची आवड निर्माण झाली. वयाच्या 24 व्या वर्षी 'तरुण भारत' वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून त्यांना बांगलादेशात पाठवण्यात आले होते, जिथे त्यांनी बांगलादेश मुक्ती वाहिनीच्या क्रांतीकार्याबद्दल अनेक लेख लिहिले आणि प्रत्यक्ष युद्धाच्या काळातही तिथे राहून भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या.

युद्ध संपल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून संरक्षण आणि सामरिकशास्त्र विषयात एम.ए. पदवी घेतली. शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्राचा अभ्यास करताना ते शिवचरित्राकडे वळले. यासाठी त्यांनी मोडी लिपीसह फारसी, उर्दू, जर्मन, फ्रेंच, आणि पोर्तुगीज भाषा शिकून घेतल्या. मूळ ऐतिहासिक साधने आणि मुघलांची कागदपत्रे अभ्यासण्यासाठी ते भारतभर फिरले.

( नक्की वाचा : Marathwada Mukti Din हैदराबादला स्वतंत्र मुस्लीम देश बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निजामानं कशी पत्करली शरणागती? )
 

या सखोल संशोधनातूनच 'Shivaji His Life and Times' (1,000 पानांचा इंग्रजी ग्रंथ) आणि 'श्री राजा शिवछत्रपती' (2,500 पानांचा मराठी ग्रंथ) हे महत्त्वाचे ग्रंथ साकारले. या ग्रंथांमध्ये त्यांनी सुमारे 7,000 संदर्भ दिले आहेत. या व्यतिरिक्त, त्यांनी 'शिवछत्रपतींचे आरमार', 'आदिलशाही फर्माने', 'Tipu as he really was' (इंग्लिश पुस्तिका) यांसारखे ग्रंथही लिहिले. औरंगजेबाच्या धार्मिक धोरणांवर त्यांचा एक ग्रंथ लवकरच प्रकाशित होणार होता.

गजानन मेहेंदळे यांनी 2000 ते 2017 या 17 वर्षांच्या काळात पहिले आणि दुसरे महायुद्ध यावर सुमारे 6,000 पानांचे लेखन पूर्ण केले होते, ज्याचे 10 ते 12 खंड प्रकाशित होणार होते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे ज्येष्ठ सभासद म्हणून त्यांनी पन्नास वर्षे सेवा दिली. ते भांडारकर संस्था, डेक्कन कॉलेज आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाशीही संलग्न होते. भारत सरकारच्या भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे (ICHR) ते सल्लागार सदस्य होते आणि महाराष्ट्र शासनाने शिवरायांची जन्मतिथी निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीतही त्यांचा समावेश होता. त्यांच्या निधनाने इतिहास संशोधन क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सखोल अभ्यास आणि संशोधनावर भर

शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी मेहंदळे यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. त्यांनी पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळात जाऊन शिवकालीन कागदपत्रांचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी मोडी लिपी, फारसी, उर्दू आणि काही प्रमाणात पोर्तुगीज भाषा देखील शिकून घेतल्या. तब्बल 30 वर्षांच्या कठोर संशोधनानंतर त्यांनी दोन महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित केले.

'श्री राजा शिवछत्रपती': हा दोन खंडांचा मराठी ग्रंथ शिवपूर्वकाळापासून अफजलखान वधापर्यंतची माहिती देतो. यात केवळ शिवचरित्रच नव्हे, तर इतिहासलेखन पद्धती आणि ऐतिहासिक साधनांवरही विस्तृत माहिती आहे.

'Shivaji His Life and Times': हा इंग्रजी ग्रंथ शिवपूर्वकाळापासून शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंतच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेतो.

मेहंदळे यांचे साहित्य

मेहंदळे यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले, ज्यांनी इतिहासप्रेमींना मोलाची माहिती दिली. त्यांच्या काही प्रमुख ग्रंथांची यादी

  • श्री राजा शिवछत्रपती खंड 1, 2 
  • Shivaji His Life and Times
  • शिवछत्रपतींचे आरमार (सहलेखक: संतोष शिंत्रे )
  • आदिलशाही फर्माने (सहलेखक: निनाद बेडेकर, रविंद्र लोणकर )
  • Tipu as He Really Was
  • इस्लामची ओळख 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com