जाहिरात

Retired ST Employees : सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा; आता चिंता न करता जोडीने करा प्रवास

विधानभवनात पार पडलेल्या एका बैठकीत राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.

Retired ST Employees : सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा; आता चिंता न करता जोडीने करा प्रवास
AI Image

Retired ST Employees : आज विधानभवनात कर्मचारी संघटनांसोबत बैठक पार पडली. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानभवन येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. बैठकीत कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या तक्रारी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा...

MSRTC च्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. विधानभवनात पार पडलेल्या एका बैठकीत राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आतापर्यंत एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मोफत प्रवासाबाबत काही मर्यादा होत्या.

नक्की वाचा - MHADA : मुंबईजवळील म्हाडाच्या घरांसाठी लागली रांग, आधी पाठ फिरवली, मात्र प्रशासनाच्या एका निर्णयामुळे भरभराट!

मात्र आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नी किंवा पतीसह वर्षभर मोफत प्रवास करता येणार आहे. परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो सेवानिवृत्त कर्मचारी कुटुंबांना होणार असून, उतारवयात त्यांना यामुळे मोठा आर्थिक आधार मिळेल. आगारांमधील व्यवस्थापन आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com