जाहिरात

MHADA : मुंबईजवळील म्हाडाच्या घरांसाठी लागली रांग, आधी पाठ फिरवली, मात्र प्रशासनाच्या एका निर्णयामुळे भरभराट!

गेल्या कित्येक महिन्यांपासून रिकाम्या असलेल्या घरांसाठी ग्राहकांची रांग...

MHADA : मुंबईजवळील म्हाडाच्या घरांसाठी लागली रांग, आधी पाठ फिरवली, मात्र प्रशासनाच्या एका निर्णयामुळे भरभराट!
AI Image

MHADA News : सर्वसामान्यांना परवडणारी घरं मिळवून देणाऱ्या म्हाडाबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांमुळे मुंबईजवळील म्हाडांची घरं खरेदी करण्यासाठी रांग लागली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही घरं विकली जात नव्हती. मात्र आता झपाट्याने येथील घरं विकली जात आहेत. 

म्हाडाच्या कोकण बोर्डाच्या विरारच्या घरांची मागणी वाढली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून रिकाम्या असलेल्या घरांसाठी ग्राहकांची रांग लागली आहे. कोकण बोर्डाकडून दररोज तब्बल २५ घरांची विक्री केली जात आहे. गेल्या १५२ दिवसात विरारमधील तयार असलेली ३७५० घरांची विक्री झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात घरं उपलब्ध करून देण्यासाठी २०१४ मध्ये म्हाडाने विरार बोलिंजमध्ये ९,४०९ घरं तयार केली होती. मात्र या परिसरातील पाण्याची समस्या आणि अन्य कारणांमुळे घरांची विक्री होऊ शकत नव्हती. 

गेल्या वर्षी सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत सूर्या नदीचं पाणी विरारपर्यंत पोहोचल्यामुळे येथील पाण्याची अडचण दूर झाली आहे. विरारमध्ये ९,४०९ घरांपैकी ७,७८३ घरांची विक्री झाली आहे. ७,७८३ घरांपैकी ३,७५० घरं गेल्या १५२ दिवसात विकले गेले आहेत. घरांच्या विक्रीत म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं जात आहे. या घरांच्या किमतीत सूट आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ही योजना यशस्वी ठरली आहे. 

नक्की वाचा - Virar News : 15 व्या वर्षी दीक्षा, 6 वर्षात मृत्यू; तीर्थक्षेत्राजवळ जैन भिक्षूच्या मृत्यूने समाजात शोककळा

इतर ठिकाणीही मागणी वाढली...

विरारसह कोकण बोर्डाद्वारा तयार अन्य ठिकाणांवरील घरांची विक्री वाढली आहे. २०१९-२० मध्ये मंडळाने भंडलीमध्ये १,७६९ घरे बांधली होती. यापैकी आतापर्यंत १,७६१ घरांची विक्री पूर्ण झाली आहे. विकलेल्या १,७६१ घरांमध्ये ८११ घरं गेल्या पाच महिन्यात विकले गेले आहेत. २०१९-२० मध्ये घोटेघरात १,६५९ घरं बांधले गेले होते. येथे केवळ ६७ घरांची विक्री होणं बाकी आहे. 

नागरिकांना आकर्षित करणारे प्रकल्प...

सरकारकडून मुंबई ते विरारदरम्यान अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा प्रकल्प उभारले जात आहेत. यामध्ये सी लिंकपासून कोस्टल रोडसारख्या अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. हे सर्व प्रकल्प एकमेकांना कनेक्ट करणार आहेत. यामध्ये वांद्र-वर्सोवा सी लिंक, वर्सोवा-दहिसर आणि दहिसर-भाईंदर कोस्टल रोड आणि उत्तन-विरार सी लिंक प्रकल्पांचा समावेश आहे. तर बुलेट ट्रेनदेखील विरारवरुन जाणार आहे. विरार-अलिबाग कॉरि़ोरच्या माध्यमातून लोक रायगडपर्यंत सहज पोहोचू शकतात. यामुळे लोक तासांऐवजी काही मिनिटांमध्ये एमएमआरच्या  कोणत्याही भागात पोहोचू शकतात. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com