जाहिरात

Supreme Court : इस्तर अनुह्या प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या रिक्षाचालकाची निर्दोष मुक्तता

मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या चंद्रभान सानप याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Supreme Court : इस्तर अनुह्या प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या रिक्षाचालकाची निर्दोष मुक्तता

मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या चंद्रभान सानप याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्याच्यावर मुंबईतील 23 वर्षीय तांत्रिक तज्ज्ञ इस्तेर अनुह्यावरील दुष्कृत्य आणि हत्येचा सानपवर आरोप होता. सनप याला 2015 मध्ये एका विशेष महिला कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं.

मात्र उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली होती. यानंतर सानपने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. सर्वोच्च न्यायालयाने फिर्यादीच्या तथ्यांमध्ये कमतरता असल्याचं सांगत आरोपीची सानपची निर्दोष मुक्तता केली आहे.  

Saif Ali Khan Attack : हा तो नव्हेच? सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठा धक्का

नक्की वाचा - Saif Ali Khan Attack : हा तो नव्हेच? सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठा धक्का

काय आहे प्रकरण?
फिर्यादी पक्षानुसार, 5 जानेवारी 2014 रोजी पीडिता आंध्रप्रदेशात आपल्या आई-वडिलांना भेटल्यानंतर पहाटे पाच वाजता मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचली होती. पहाटेची वेळ होती. यावेळी स्टेशनबाहेर तिला सानप भेटला. सानपने पीडिताला 300 रुपयात आपल्या दुचाकीने अंधेरीतील YWCA वसतिगृहात पोहोचविण्याची ऑफर दिली. पीडितेनेही ते मान्य केलं. मात्र रस्त्यात सानप तिला कांजुरमार्गजवळ एका निर्जन स्थळी घेऊन गेला. त्याने येथेच तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली, असं फिर्यादी पक्षाकडून सांगण्यात आलं. ज्यानंतर 14 जानेवारीला पीडिताच्या कुटुंबीयांना मुलीचा मृतदेह सापडला होता.      

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com