Krishnraj Mahadik : रिंकू राजगुरूशी लग्नाची चर्चा सुरू असलेले कृष्णराज महाडिक कोण आहेत?

Rinku Rajguru and Krishnraj Mahadik Photo : अनेकांनी दोघांचं अभिनंदन केलं. दोघांचं ठरलं का? लग्न करण्याचा विचार आहे की काय? मग कधी आणि कसं जुळलं? असे प्रश्न चाहत्यांनी विचारले.

जाहिरात
Read Time: 3 mins

Rinku Rajguru and Krishnraj Mahadik Photo : कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा धाकटा मुलगा कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा (Krishnaraj Mahadik Marriage) एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन दोघांच्या लग्नाची मोठी चर्चा सुरू झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वीच धनंजय महाडिक यांनी कृष्णराज महाडिक यांच्या लग्नाबाबत वक्तव्य केलं होतं. या वर्षात कृष्णराजचं लग्न करायचंय. 2025 चा हा माझा संकल्प असल्याचं ते यावेळी म्हणाले होते. त्यानंतर कृष्णराज आणि रिंकूचा फोटो समोर आल्याने लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

कोण आहे कृष्णराज महाडिक?
महाडिकांचं कोल्हापूरात मोठं प्रस्थ आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक यांना तीन मुलं. त्यातील पृथ्वीराज महाडिक आणि विश्वराज महाडिक ही दोन मोठी मुलं. त्यानंतर कृष्णराज महाडिक तिसऱ्या क्रमांकाचे. सध्या तरी कृष्णराज महाडिक राजकारणात फार सक्रिय नसले तरी त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. विशेष म्हणजे ते एक युट्यूबर आहेत. Krish Mahadik नावाचं त्यांचं युट्यूब चॅनल आहे. यावर त्यांचे सहा लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. सोशल मीडियावर ते प्रचंड सक्रिय असतात. कृष्णराज महाडिक आंतरराष्ट्रीय कार रेसरही आहेत. अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय गो-कार्टिंग चॅम्पियनशीप जिंकली. यानंतर कृष्णराज यांनी 2012 आणि 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय कार्टिंग इव्हेट रोटॅक्स मॅक्स वर्ल्ड ग्रँड फायनलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. असं करणारे ते एकमेव भारतीय होते. 

Advertisement

(नक्की वाचा- Actor Break-Up : ब्रेक अप करून मोकळा झाला, इन्स्टा इन्फ्लुएन्सर मैत्रिणीमुळे अभिनेत्याची लागली वाट)

(नक्की वाचा- Rinku Rajguru: रिंकू होणार कोल्हापूची सून? भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलासोबतच्या Photo ने चर्चा)

"आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले", असं कॅप्शन देत कृष्णराज महाडिक यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली.  कृष्णराज आणि रिंकू या दोघांचीही सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या मोठी असल्याने काही वेळातच हा फोटो व्हायरल झाला. अनेक लाईक्स आणि कमेट्स या फोटोवर येऊ लागल्या. अनेकांना "एक नंबर जोडी आहे"  अशी कमेंट करत त्याचं लग्न ठरल्यापर्यंत चर्चा पुढे नेली. अनेकांनी दोघांचं अभिनंदन केलं. दोघांचं ठरलं का? लग्न करण्याचा विचार आहे की काय? मग कधी आणि कसं जुळलं? असे प्रश्न चाहत्यांनी विचारले.

Advertisement

नक्की वाचा - Rahul Solapurkar : जॅगोदादा ते टकलू हैवान, ऐतिहासिक वादात अडकणारे राहुल सोलापूरकर कोण आहेत? 

"जोडी छान आहे लग्नाचा विचार केला तर हरकत नाही", अशीही कमेंट एकाने केली. कृष्णराज महाडिक यांच्या एका कार्यकर्त्यांने तर निर्णय घेऊन टाका असं आवाहन केलं. त्याने कमेंटमध्ये लिहिलं की, "अंबाबाई चरणी नतमस्तक होऊन मी सांगतो साहेब बिनधास्त निर्णय घ्यावा. जबरदस्त छान जोडी जमते. मी एक कार्यकर्ता म्हणून इच्छा व्यक्त करत आहे."

काहींनी अशा चर्चा न करण्याचंही आवाहनं केलं. एकाने लिहिलं की, "अहो ही संस्कृती आहे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करायची. त्याला वेगळा रंग देऊ नका. महाडिक कुटुंब हे सुसंस्कृत आहे. त्यामुळे त्यांची येणारी सूनही सुसंस्कृत असेल." दुसऱ्या एकाने लिहिलं की, "काय तुम्ही लोक कमेंट्स करताय. ते महाडिक घराणेशाही आहे. त्यांच्या घरातील सर्व महिला या सुसंस्कृत आणि रूढी परंपरा जपणाऱ्या आहेत.  अरुंधती महाडिक यांच्या समोर तुमच्या या रिंकूताईंचा निभाव तरी लागेल का आणि कृष्णराज दादासाठी मुलगी ही लाखात एक असेल. अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकेल अशी."

Advertisement