![Rahul Solapurkar : जॅगोदादा ते टकलू हैवान, ऐतिहासिक वादात अडकणारे राहुल सोलापूरकर कोण आहेत? Rahul Solapurkar : जॅगोदादा ते टकलू हैवान, ऐतिहासिक वादात अडकणारे राहुल सोलापूरकर कोण आहेत?](https://c.ndtvimg.com/2025-02/h3jpsq6o_rahul-solapurkar_625x300_10_February_25.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
Rahul Solapurkar Controversial Statement : शिवाजी महाराज आग्र्यातून लाच देऊन सुटले असं वादग्रस्त वक्तव्य करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक पूत्र म्हटलं आहे. ते मूळचे ब्राम्हण असल्याचा दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान इतकी मोठमोठी वक्तव्य कोणत्याही आधार वा संदर्भाशिवाय करणारे राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) कोण आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राहुल सोलापूरकर यांनी 'ग्रेट गाढव सर्कस' नावाच्या बालनाटकातही काम केलं होतं. येथे सोलापूरकरांनी जॅगोदादाची भूमिका केली होती. 'थरथराट' या चित्रपटातील 'टकलू हैवान' ही भूमिका साकारली होती. डॉ. जब्बार पटेलांच्या 'पडघम' या एकाच नाटकात निरनिराळ्या अकरा भूमिका साकारल्या. त्यानंतर ते अनेक चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसले. 'नशिबवान' चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली. नाटक, मराठी चित्रपटांबरोबरच ते मालिकांमध्येही काम करीत होते. राजर्षी छत्रपती शाहू या मालिकेत ते शाहू महाराजांच्या भूमिकेत दिसले.
राहुल सोलापूरकर मूळचे पुण्याचे. त्यांचं बालपण पुण्यातील शनिवार पेठेतील. त्यांचं शालेय शिक्षण नूतन मराठी शाळेत तर एसपी महाविद्यालयात त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. लहानपणापासून त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव. अभिनयाबरोबरच राहुल सोलापूरकर व्याख्यानं देण्याचंही काम करतात. स्वामी विवेकानंद, शाहू महाराज, शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी ते अधिकांशपणे बोलताना दिसतात. पुढच्या पिढीसाठी 10 ते 20 वयोगटातील मुलांसाठी सांगली येथे वर्ग चालवले जातात. विशेष म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि मुलांची क्षमता वाढविण्यासाठी अशा वर्गाचा आराथडा तयार करण्यासाठी सोलापूरकर विशेष लक्ष देतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world