जाहिरात

RSS : 'ज्याची श्रद्धा असेल तो कबरीवर जाईल', संघाच्या वरिष्ठांनी भाजप नेत्यांचे टोचले कान

महाराष्ट्रात सुरू असलेल्या धार्मिक तेढ निर्माण झाल्याने चिंता व्यक्त केली जात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य महत्त्वाचं ठरत आहे.

RSS : 'ज्याची श्रद्धा असेल तो कबरीवर जाईल', संघाच्या वरिष्ठांनी भाजप नेत्यांचे टोचले कान

छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीवरुन वातावरण तापलं आहे. त्याचा परिणाम नागपूर दंगलीत पाहायला मिळाला. याशिवाय बीडमध्ये दोन तरुणांनी मशिदीत स्फोट केल्याचा संतापजनक प्रकार घडला. महाराष्ट्रात सुरू असलेल्या धार्मिक तेढ निर्माण झाल्याने चिंता व्यक्त केली जात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य महत्त्वाचं ठरत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरू असलेल्या वादावर आपली भूमिका मांडली आहे. त्याचा मृत्यू इथं झालाय म्हणून त्याची कबर इथं बनविण्यात आली आहे. ज्यांची श्रद्धा आहे ते औरंगजेबाच्या कबरीवर जातील.  आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो. त्यांनी तर अफजलखानचीही कबर बांधली होती. भारतातील उदारता आणि सर्वसमावेशकतेचं हे प्रतिक आहे, असं भैय्याजी जोशी यावेळी म्हणाले.  

MNS Melava 2025: औरंगबेजाची कबर उखडावी का? राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं, काय आवाहन केलं?

नक्की वाचा - MNS Melava 2025: औरंगबेजाची कबर उखडावी का? राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं, काय आवाहन केलं?

महाराष्ट्रात सुरू असलेल्या या धार्मिक तेढीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आपली भूमिका मांडली.  यावेळी राज ठाकरे म्हणाले, औरंगजेब विषय निघाला म्हणून परत सांगतो, त्याचं राज्य अफगाणिस्तान ते दक्षिणेपर्यंत आणि इकडे बंगाल पर्यंत. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर, औरंजेबाच्या एका मुलाला आसरा छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. 1681 ते 1707 औरंजेब महाराष्ट्रात लढत होता. आमच्या संभाजी राजांसोबत लढला, त्यांना क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले. नरहर कुरुन्दकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य आहे, मराठे सर्व लढाया हरत होते पण औरंगजेब एकही लढाई जिंकला नाही.