'समाजवादी पक्ष भाजपची बी टीम वाटते', आदित्य ठाकरेंचा अबू आझमींवर पलटवार

महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष कधी कधी भाजपची बी टीम असल्यासारखं काम करताना दिसतो, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मोठा आरोप केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केल्याने समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीतून वेगळं होण्याचा इशारा दिला आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. समाजवादी पक्ष कधीकधी भाजपची बी टीम वाटतो, असा पलटवार आदित्य ठाकरे यांना केला आहे. शिवसेना ठाकरे गट हिंदुत्वासोबत आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. 

नक्की वाचा - Cabinet Expansion : शिवसेनेच्या 2 माजी मंत्र्यांच्या पत्ता कट? संभाव्य 11 मंत्र्यांची नावे आली समोर

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन केलेल्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, मी यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. अखिलेश यादव आपली लढाई वर लढत आहेत. मात्र महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष कधी कधी भाजपची बी टीम असल्यासारखं काम करताना दिसतो. आमचं हिंदुत्व 'हृदयात राम आणि हाताला काम असं आहे. आमचं हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन जाणारं आहे.

महाराष्ट्रात ईव्हीएममध्ये गडबड झाल्य़ाच्या आरोपांचं समर्थन करताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, जनतेची एकच मागणी आहे की बॅलेट पेपर मॉक पोल झाला पाहिजे. मॉक पोलने काही बदलणार नाही. सरकार बदलणार नाही की जनादेश बदणार नाही. मात्र आम्हाला केवळ सत्य लोकांसमोर आणायचं आहे. भारत देश 'सत्तामेव जयते' नाहीतर 'सत्यमेव जयते'वर चालतो. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सत्तामेव जयतेवर काम करतात. 

Advertisement

नक्की वाचा - जळगावात शरद पवार गटाला मोठा धक्का, बडा नेता अजित पवार गटात सामील होणार

काय म्हणाले होते अबू आझमी?
अबू आझमी यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. "विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला आहे. आमचा हिंदुत्वाचा मुद्दा कायम आहे, मात्र सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ असं म्हटलं नाही." 

Advertisement

"6 डिसेंबर रोजी बाबरी मशिद पाडल्याबद्दल आम्ही निषेध नोंदवतो. मात्र उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, ज्या शिवसैनिकांनी हे केलं त्यांचं आम्ही स्वागत करतो. उद्धव ठाकरे जर म्हणत असतील तरी समाजवादी पक्ष महाविकास आघाडीसोबत राहणे राहाणं शक्य नाही", असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.