2025 मध्ये मुंबई-नागपूर प्रवास अवघ्या 8 तासात, शेवटच्या टप्प्याचं 100 टक्के काम पूर्ण

मुंबईकर आणि नागपूरकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. इगतपुरी-आमणे या शेवटच्या टप्प्याचं 100 टक्के काम पूर्ण झालं असून जानेवारी 2025 मध्ये हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा प्लान आहे. हा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपूर - मुंबई प्रवास केवळ आठ तासात पार करता येणार आहे. 

नक्की वाचा - Karnataka IPS Officer : मेहनत करुन IPS बनला, मात्र पहिली पोस्टिंग घेण्यासाठी जाताना वाटेतच अपघाती मृत्यू

एमएसआरडीसीने नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पाअंतर्गत नागपूर ते मुंबई हा प्रवास 16 तासांवरुन केवळ 8 तासांवर पोहोचणार आहे. सध्याच्या घडीला नागपूर ते इगतपुरी असा 625 किमी महामार्ग सेवेत दाखल आहे. तर इगतपुरी ते आमणे असा 76 किलोमीटरच्या महामार्गाचं काम सध्या सुरू आहे. या अर्धवट महामार्गाचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत या शेवटच्या टप्प्याचं 100 टक्के काम पूर्ण झालं असून फिनिशिंगची कामं वेगाने सुर आहे. ही कामं डिसेंबरअखेरीत पूर्ण होतील. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नवीन वर्षापर्यंत हा टप्पादेखील सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास इगतपुरी ते आमणे, भिवंडी अंतर केवळ 40 मिनिटात पार करता येईल. सध्या हे अंतर पार करण्यासाठी दोन ते अडीच तासांचा वेळ लागतो. मात्र इगतपुरी ते आमणे हा टप्पा सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा टप्पा केवळ 40 मिनिटात पार करता येणार आहे. 

Advertisement