जाहिरात

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावर 4 महत्त्वपूर्ण सुविधा उभारण्याचे CM फडणवीसांचे निर्देश

Samruddhi Mahamarg News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (1 ऑक्टोबर 2025) मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली.

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावर 4 महत्त्वपूर्ण सुविधा उभारण्याचे CM फडणवीसांचे निर्देश
"Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर"
ANI And PTI

Samruddhi Mahamarg News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीमध्ये नागपूर ते चंद्रपूर या 204 किलोमीटर लांबीच्या चार पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला मान्यता देण्यात आली. तसेच चंद्रपूर ते मूल दरम्यान महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, भविष्यात कुठलाही रस्ता बांधताना रस्त्याच्या परिसरात विकासाची 'इकोसिस्टीम' उभी राहिली पाहिजे. त्यासाठी सुरुवातीपासूनच भूसंपादन आणि नियोजन व्हावे. नागपूर-चंद्रपूर महामार्ग नवेगाव मोरेपर्यंत होत असल्याने पुढे सुरजागड लोह प्रकल्पापर्यंत महामार्गाची लांबी वाढवावी.

अर्थव्यवस्थेला मोठा बूस्ट मिळणार: CM फडणवीस

विकास प्रकल्प निश्चित कालमर्यादेमध्ये पूर्ण झाले पाहिजेत. विलंब झाल्यास खर्च वाढतो आणि राज्यावर आर्थिक ताण येतो. सध्या राज्यात 10 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला मोठा बूस्ट मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्प वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

समृद्धी महामार्गाबाबत महत्त्वपूर्ण निर्देश

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व पायाभूत सुविधा प्रकल्प गतिशक्ती पोर्टलवर आणण्याचे निर्देश दिले आणि झालेल्या कामांची देयके अदा होण्यासाठी विभागांनी सुरुवातीपासूनच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजन करण्यावर भर दिला. तसेच समृद्धी महामार्गावर स्वच्छतागृह, पेट्रोल पंप, फूड मॉल आणि पर्यटन केंद्रांची उभारणी करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी निधी उभारणीसाठी नवीन मॉडेल विकसित केले जाईल. गुंतवणूकदारांचा निधी भूसंपादन आणि विकास प्रक्रियेत वापरला जाईल व त्यांना निश्चित मोबदला देण्यात येईल.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: ANI

(नक्की वाचा: Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर वीज निर्मिती! वीज निर्मिती करणारा देशातला पहिला हायवे)

पूर्व विदर्भातील पायाभूत रस्ते प्रकल्प

  • नागपूर-चंद्रपूर 204 किलोमीटर. चौपदरी सिमेंट काँक्रीट महामार्ग : अंदाजित खर्च 2353.39 कोटी रुपये
  • नागपूर-गोंदिया 162 किलोमीटर चौपदरी द्रुतगती महामार्ग : अंदाजित खर्च 18,539 कोटी रुपये
  • भंडारा-गडचिरोली 94 किलोमीटर चौपदरी द्रुतगती महामार्ग : अंदाजित खर्च 10,298 कोटी रुपये
Listen to the latest songs, only on JioSaavn.com