जाहिरात

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर वीज निर्मिती! वीज निर्मिती करणारा देशातला पहिला हायवे

भविष्यात केवळ समृद्धी महामार्गावरच नव्हे, तर इतर प्रस्तावित महामार्गांवरही असे प्रकल्प राबवण्याचा विचार आहे.

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर वीज निर्मिती! वीज निर्मिती करणारा देशातला पहिला हायवे
मुंबई:

हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आता केवळ वेगवान प्रवासासाठीच नव्हे, तर सौरऊर्जा निर्मितीसाठीही ओळखला जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या महामार्गावर महत्त्वाकांक्षी सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला असून, यामुळे समृद्धी महामार्ग देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प ठरला आहे. बुलढाणा येथील कांरजालाड आणि वाशिम (Washim) जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथील सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. सौरऊर्जा (Solar) निर्मितीमुळे समृद्धी महामार्ग हा देशातील पहिलाच पथदर्शी प्रकल्प ठरला आहे. 

नक्की वाचा - Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअर पोर्टवरून कुठे कुठे विमानं जाणार? एअर इंडियाने जारी केली पहिली लिस्ट

पहिले टप्पे कार्यान्वित
या प्रकल्पाचा पहिला टप्पा बुलढाणा जिल्ह्यातील कांरजालाड आणि वाशिम जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता 9 मेगावॅट आहे. त्यापैकी, कांरजालाड येथील 3 मेगावॅट आणि मेहकर येथील 2 मेगावॅट क्षमतेच्या वीज निर्मितीला नुकताच प्रारंभ झाला आहे. यामुळे महामार्गावर सौरऊर्जा निर्मितीला गती मिळेल अशी अपेक्षा आहे. अशा पद्धतीचा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. 

नक्की वाचा - Big News: जन आरोग्य योजनेबाबत मोठा निर्णय, आता 5 लाखांहून अधिक खर्चाच्या 9 दुर्धर आजारांवर...

नवीन उत्पन्नाचा स्त्रोत
नागपूर आणि मुंबईला जोडणाऱ्या या 701 कि.मी. लांबीच्या महामार्गावर आतापर्यंत 2.25 कोटींहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. समृद्धी महामार्गाच्या आखणीवेळीच सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महामंडळाने या महामार्गाच्या इंटरचेंजवर एकूण 204 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले आहे. या निर्मितीमुळे महामंडळाला पथकराव्यतिरिक्त उत्पन्नाचा नवीन स्त्रोत उपलब्ध झाला आहे. महासमृद्धी रिन्युएबल एनर्जी लि. आणि महावितरण यांच्यात 2022 साली झालेल्या करारानुसार, ही वीज 3.05 रुपये प्रति युनिट दराने विकली जाईल.

नक्की वाचा - Kalyan News: 7 जणांकडून 5 महिने 1 अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अश्लील VIDEO व्हायरल

कार्बन क्रेडिटचा लाभ
भविष्यात केवळ समृद्धी महामार्गावरच नव्हे, तर इतर प्रस्तावित महामार्गांवरही असे प्रकल्प राबवण्याचा विचार असल्याचे महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल यांनी सांगितले. या सौरऊर्जा निर्मितीतून कार्बन क्रेडिट देखील महामंडळाच्या खात्यात जमा होणार आहे, ज्यामुळे भविष्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी कर्ज मिळवणे सोपे होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या वतीने हा प्रकल्प यशस्वी पणे राबला गेला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com