शरद सातपुते, सांगली
Sangli Crime News : समलैंगिक संबंधाला नकार दिल्याने एका मित्राचा त्याच्या अल्पवयीन मित्रांकडून खून करण्यात आली आहे. सांगलीच्या आरग येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुजल पाटील 21 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतलं आहे.
(नक्की वाचा - Dharashiv : बाप नाही हैवान, जन्मदात्यानं लेकीला कुऱ्हाडीचे घाव घालून संपवलं! )
आर्मीमधील एका तलावामध्ये अर्धनग्न अवस्थेत सुजल याचा मृतदेह आढळून आला होता. सुजल आणि त्याचे दोघे मित्र हे बेळंकी या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यानंतर तिघेही दुचाकीवरून घरी परतत असताना,आरगमधल्या बेळंकी रोडवरील तलावाजवळ पोहोचले. त्याठिकाणी दारूच्या नशेत असलेल्या दोघा मित्रांकडून सुजल याच्यासोबत समलैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
( नक्की वाचा : 'मी 18 एकरचा मालक... माझं लग्न होत नाही' प्रवचनात व्यथा मांडणाऱ्या व्यक्तीचा सापडला मृतदेह )
मात्र सुजलने विरोध केल्याने, चिडलेल्या दोघा मित्रांनी सुजल याला मारहाण करत तलावातल्या पाण्यात बुडवून ठार केले. त्यानंतर अर्धनग्न अवस्थेत त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी सुजलच्या दोघा अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतले आहे. मात्र समलैंगिक संबंधातून अल्पवयीन मित्रांकडूनच मित्राचा खून केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.