Sangli News : बेंदूर सणानिमित्त सांगलीतील प्रसिद्ध गज्या बैलाच्या सांगाड्याची गावातून मिरवणूक; पण काय आहे कारण? 

गज्या बैलाच्या पश्चात सांगाड्याचा भव्य देखावा व मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

सांगली (Sangli News) जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रजमध्ये बेंदूर (Bendur Festival) सणानिमित्त एका मेलेल्या बैलाच्या सांगाड्याचा मिरवणूक सोहळा पार पडला. हा भारतातील सर्वात मोठा बैल म्हणून ओळख मिळवलेल्या गज्या बैल (Gajaya bull). त्याच्या मृत्यू पश्चात गज्याच्या सांगड्याचा भव्य देखावा आणि मिरवणूक सोहळा बेंदूर सणानिमित्त पार पडला. 

गज्या बैलाची 1 टन वजन आणि आपल्या वज्रदेहामुळे 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली होती. सहा फूट उंची, दहा फूट लांबं अशा या बैलाचं २०२१ मध्ये निधन झालं होतं. मात्र त्याच्या शरीरयष्टीमुळे ते महाराष्ट्रच काय पण देशभरात चर्चिला गेला होता. त्यामुळे महाराष्ट्रात बेंदूर सणाच्या निमित्ताने आणि गज्या बैलाच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून या गज्या बैलाच्या सांगड्याचा मिरवणूक सोहळा कसबे डिग्रज गावामध्ये पार पडला.  

नक्की वाचा - Guru Purnima 2025 : गुरुपौर्णिमेनिमित्ताने साईनगरी, अक्कलकोट हाऊसफुल; दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी

गज्या बैल हा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील सर्वात मोठा बैल होता. त्यामुळे गज्या बैलाच्या पश्चात सांगाड्याचा भव्य देखावा व मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच बरोबर अन्य बैल जोडीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आपल्या बैल जोडीला रंगवून त्याची आकर्षक सजावट करण्यात आली होती. आपल्या बैलजोडीला आकर्षक बनवण्यासाठी गळ्यात रंगीबेरंगी दोर आणि शिंगाना गोंडे बांधून त्याची मिरवणूक काढण्यात आली.   
 

Topics mentioned in this article