जाहिरात

Sangli Rain: अलर्ट! कृष्णामाई भरली, वारणा नदीही पात्राबाहेर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

रविवारी दिवसभरात पाणीपातळीत सुमारे साडे चार  फुटांची वाढ झाली आहे. सकाळपासून पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने नागठाणे बंधारा दुपारी पाण्याखाली गेला आहे. 

Sangli Rain:  अलर्ट! कृष्णामाई भरली, वारणा नदीही पात्राबाहेर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

शरद सातपुते, सांगली: सांगलीमधील पलूस तालुका तसेच कृष्णाकाठ परिसरात रविवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. गेले दोन दिवस धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे दुथडी भरून  वाहत असलेली कृष्णा नदी पात्राबाहेर पडली आहे. रविवारी दिवसभरात पाणीपातळीत सुमारे साडे चार  फुटांची वाढ झाली आहे. सकाळपासून पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने नागठाणे बंधारा दुपारी पाण्याखाली गेला आहे. 

धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पडणारा पाऊस आणि आणि धरणातून केला जाणारा विसर्ग यामुळे सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे. वारणा नदीही पात्रा बाहेर पडली आहे. तर कृष्णेची पातळी ही तब्बल 25 फुटावर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे.  कोयनेतून 31 हजार 746 क्युसेक्स ने पाण्याचा विसर्ग कृष्णा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. 

Rain News: रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

तर सांगलीच्या वारणा धरणातून 14 हजार 880 क्युसेक्स विसर्ग वारणा पात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.  त्यामुळे आसपासच्या शेतामध्ये पाणी गेले आहे. त्यामुळे पिकाचे ही नुकसान होत आहे. असाच जर विसर्ग राहिला तर आणखी पाणी पातळी वाढणार आहे. तर पाणी पातळी वाढत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सुरक्षेच्या दृष्टीनेभिलवडी पोलीस आणि पोलीस पाटील दिपक कराडकर यांनी बंधार्यावरील वाहतूक बंद केली आहे यामुळे नागठाणे गावाचा शिरगावशी संपर्क तुटला आहे. बुर्ली आमणापूर धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरू लागले आहे. त्यामुळे मळीतील गवत कापणीसाठी  शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. तर हौशी तरूणाईची अनेक ओढ्यामध्ये मासे पकडण्याची खटापट सुरू आहे

या संततधार पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला असून गारठा प्रचंड वाढला आहे. नदी पात्राबाहेर पडल्याने  सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत. गेले दोन दिवस कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार बँटींग केली. त्यामुळे विसर्ग वाढवण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update : धरणं फुल्ल! तीन जिल्हे वगळता राज्यभरात पावसाचा जोर ओसरला..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com