जाहिरात

Sangli News: तुमची मुलं सुरक्षित आहेत का? झेडपी शाळेची अभिनव आयडिया, पालक- शिक्षकांचं टेन्शन मिटलं!

शाळा सुटल्यानंतर बऱ्याचदा मुलं लवकर घरी पोहोचता येते नाही किंवा सुखरूप घरी पोहोचतात की नाही ह्याच्याबद्दलची शिक्षकाना  नेहमी टेन्शन लागलेले असतो.

Sangli News: तुमची मुलं सुरक्षित आहेत का? झेडपी शाळेची अभिनव आयडिया, पालक- शिक्षकांचं टेन्शन मिटलं!

शरद सातपुते, सांगली:

Sangli ZP School News:  शाळेत जाणाऱ्या मुला मुलींच्या अपहरणाच्या, फूस लावून पळवल्याच्या घटना अनेकदा घडत असतात. या घटनांमुळे शाळकरी मुला मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावर उपाय म्हणून कवठेमहांकाळ तालुक्यातील एका शाळेने अभिनव आयडिया काढली आहे. अलकुड एम गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग करण्यात आला आहे. या प्रयोगामुळे शाळेतील मुलं कोणत्या वेळी कुठे आहेत? हे लगेच ट्रॅक होणार आहे. 

मुलांच्या सुरक्षेसाठी अभिनव आयडिया

मुलं शाळेत पोचली की नाही,  मुलं शाळेतून निघाली की नाही हा घोर सतत पालकांना सतावत असतो. याला कारण आहे अलीकडे लहान मुलांच्या किडनॅपिंगच्या वाढत चाललेल्या घटना.. याच पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एम गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल आयडेंटिटी हा प्रयोग राबवला गेला आहे.

Air Ambulance Crash: रांचीवरून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू

मुलाच्या गळ्यात असलेल्या आयडेंटिटीमध्ये मागील बाजूस  एक स्कॅनर लावला गेला आहे. जो स्कॅनर शाळेत शिक्षकांनी स्कॅन केल्यानंतर पालकांना मेसेज जातो की मुलगा शाळेमध्ये आलेला आहे तर संध्याकाळी पाच वाजता परत शाळा सुटताना स्कॅनिंग केल्यानंतर पुन्हा पालकांना मेसेज जातो की शाळा सुटलेली आहे आणि मुलगा शाळेतून घरी येण्यास बाहेर पडला आहे.

पालक- शिक्षकांचं टेन्शन मिटलं! 

या गावातील अंगणवाडीमध्ये देखील हा प्रयोग राबवला जातोय. यामुळे पालकांच्या मोबाईलवरती थेट मुलं शाळेत आल्याची आणि मुलं शाळेतून घरी येत असल्याचा मेसेज येत असल्यामुळे पालकांची टेन्शन काहीच कमी झालं आहे.  शाळा सुटल्यानंतर बऱ्याचदा मुलं लवकर घरी पोहोचता येते नाही किंवा सुखरूप घरी पोहोचतात की नाही ह्याच्याबद्दलची शिक्षकाना  नेहमी टेन्शन लागलेले असतो.

पण ह्या डिजिटल आयडेंटिटीमुळे मुले शाळेतून निघाली की पालकांना  मेसेज जातो त्यामुळे मुले वेळेत घरी सुखरूप पोहोचली का नाही? याची काळजी पालक देखील घेतात आणि आणि त्यामुळे आम्हीही निश्चित  राहतो असे शिक्षकांनी आणि पालकांना सांगितले आहे. या अभिनव कल्पनेचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून मुलांच्या सुरक्षेसाठी घेण्यात आलेल्या निर्णयाचे पालकांनीही स्वागत केले आहे. 

Badlapur News : बदलापूर स्त्रीबीज विक्री प्रकरणात 300 हून अधिक महिलांचं शोषण; राज्याबाहेरील कनेक्शन उघड

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com