पर्यावरणाचा होणारा ऱ्हास सध्या सर्वात चितेंचा विषय आहे. सरकार आणि अनेक खासगी संघटनांकडून पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणांसाठी पावलं उचलली जात आहे. मात्र तेवढं पुरेसं नसून प्रत्येक नागरिकाने देखील यामध्ये हातभार लावणे गरजेचं आहे. पावसाची कमी, वाढती उष्णता यासारखे अनेक दुष्परिणाम टाळण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे हा एक पर्याय आहे. एका IAS अधिकाऱ्याने आपल्या परिने यासाठी छोटा प्रयत्न सुरु केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगली-मिरज-कुपवाडा महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी आपलं व्हिजिटिंग कार्ड सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, माझ्या कार्यालयात येणाऱ्या सर्वांना आता हे कार्ड मिळणार आहे. हे व्हिजिटिंग कार्ड खास असून ते आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
(नक्की वाचा- जॉर्जिया मेलोनींनी PM मोदींसोबत शेअर केला व्हिडिओ, मोदींकडूनही आलं उत्तर)
व्हिजिटिंग कार्डमध्ये काय आहे खास?
शुभम गुप्ता यांचं हे व्हिजिटिंग कार्ड सीड कार्ड आहे. हे व्हिजिटिंग कार्ड पर्यावरण पुरक असून काम झाल्यानंतर हे कार्ड फेकून देण्याऐवजी भिवजून कुंडीत किंवा मातीत रोवलं तर त्याचं रोप तयार होईल. झेंडूच्या बिया यामध्ये आहेत. शुभम गुप्ता यांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
सीड पेपर हा टाकूऊ कागदापासून बनवलेला बायोडिग्रेडेबल इको-पेपर आहे. यामध्ये झाडांच्या बिया असतात आणि हा पेपर तयार करण्यासाठी कोणत्याही झाडाची कत्तल केली जात नाही. जेव्हा हा सीड पेपर मातीत टाकला जातो तेव्हा या बियांमधून रोप तयार होते.
(नक्की वाचा - ATM मधून पैसे काढण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार?)
शुभम गुप्ता यांचं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 11 हजारहून अनेक जणांना हे ट्वीट लाईक केलं आहे. तर जवळपास 600 जणांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने याला ग्रीन व्हिजिटिंग कार्ड म्हटलं आहे. अशा उपक्रमांना दिली पाहिजे, असं अनेक यूजर्सने म्हटलं.