Sangli News: मुस्लीम तरुणीशी प्रेम, 19 वर्षाचा तरुण लग्नासाठी वेडापिसा, पण तिची एक अट अन् आयुष्य उद्ध्वस्त

दुर्वांक हा त्याच्या आईवडीलांना एकूलता एक होता. मात्र प्रेमात तो इतक बुडाला होता की त्याचा ही त्याला विसर पडला.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • सांगलीच्या खणाभागातील १९ वर्षांचा दुर्वांक शेवाळे पुण्यात नोकरी करत आपल्या कुटुंबाला सांभाळत होता
  • दुर्वांकला लग्नासाठी तरुणीने धर्मांतर करण्याची अट घातली होती
  • या अटीमुळे दुर्वांक नैराश्यात होता आणि त्याने राहत्या घरी आत्महत्या केली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
सांगली:

शरद सातपुते 

दुर्वांक शेवाळे हा अवघ्या 19 वर्षांचा तरुण. तो सांगलीच्या खणाभाग इथं राहत होता. पुण्यात काम करत होता. घरात एकुलता एक लेक. त्यामुळे लाडात वाढलेला. पण तेवढाच तो मेहनती ही होता. पुण्यात नोकरी करून तो आपल्या कुटुंबाला सांभाळत होता. त्याच वेळी त्याचं आयुष्य बदललं. त्याच्या जिवनात एक तरुणी आली. दोघे ही प्रेमात पडले. लग्न करण्याची ही ठरलं. पण त्याच वेळी आड आला तो धर्म. ती मुस्लीम तर दुर्वांक हिंदू. मग काय? लग्नासाठी तिने अशी एक अट टाकली त्यामुळे दुर्वांक पुर्ण पणे तुटून गेला. मानसिक दृष्ट्या खचला. तिच्या अखंड प्रेमात बुडालेल्या दुर्वांकने अखेर नको ते पाऊल उचलले. त्याने थेट राहत्या घरीच आत्महत्या केली. 

या तरुणीने लग्नासाठी धर्मांतराची अट घातल्याचा आरोप आता दुर्वांकच्या कुटुंबाने केला आहे.  सांगली शहरातील खणभाग येथील राहत्या घरी दुर्वांक प्रमोद शेवाळे या तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या दुर्वांकच्या आई वडिलांना त्याच्या मोबाईलमध्ये काही चॅट सापडली. ही चॅट इंस्टाग्रामवरची होती. त्यात मुलीने त्याला धर्म बदलण्याचा सल्ला दिला होता. ही बाब दुर्वांकच्या आई वडीलांनी पोलीसांना दाखवली. त्यांच्या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा ही दाखल केला. 

Advertisement

नक्की वाचा - Siya Goyal: सिया गोयलचं प्रत्येक राज 'या' व्यक्तीला होतं माहित? मैत्री, प्रेम अन् हत्येमागे तिसरी व्यक्ती

आता सांगली शहर पोलिसांनी दोघांच्याही सोशल मीडियाचा डाटा सायबर पोलिसांकडून मागवला आहे. दुर्वांक शेवाळे हा पुणे येथे नोकरी करत होता. त्याच्या घराजवळच राहणाऱ्या वृद्ध महिलेकडे कोल्हापूरची एक तरुणी अधूनमधून येत होती. त्यातून दोघांची ओळख झाली. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र या  तरुणीने ऐन वेळी लग्नासाठी आपला धर्म स्वीकारावा लागेल, अशी अट घातली. असा दावा दुर्वांकच्या  आई-वडिलांनी केला. याबाबतचे इंस्टाग्राम मधील चाटचे पुरावे देखील आई-वडिलांना दिसून आले आहेत. दुर्वांक हा त्याच्या आईवडीलांना एकूलता एक होता.  

नक्की वाचा - Siya Goyal: सोनम सुटली! सिया गोयल ही जामीनावर सुटणार? कोर्टाच्या 'त्या' निकालाने खळबळ

दरम्यान तरुणीच्या या अटीमुळे दुर्वांक गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. त्यातून त्याने आत्महत्या केल्याचा  आई-वडिलांनी  आरोप केला आहे. याप्रकरणी दुर्वांकच्या आईने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित तरुणी व तिला मदत करणाऱ्या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांनी दोघांच्या सोशल मीडियाचा डाटा संकलन करण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी सायबर पोलिसांकडून त्यांच्या सोशल मीडियाची माहिती मागविली आहे. ही माहिती आल्यानंतरच तपासाला  गती येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली आहे.