जाहिरात

रोहित पाटील- संजय काका एकाच वेळी समोरासमोर आले, पुढे काय झालं?

रोहित पाटील आणि संजय काका पाटील दोघेही एकाच मतदान केंद्रावर आले होते. त्यावेळी त्यांचे समर्थकही त्यांच्या बरोबर होते.

रोहित पाटील- संजय काका एकाच वेळी समोरासमोर आले, पुढे काय झालं?
सांगली:

तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदार संघात चुरशीची लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे रोहित पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजयकाका पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. प्रचारा दरम्यान या दोघामध्ये अनेक वेळा वाद झाले आहेत. आरोप प्रत्यारोपही जोरदार झाले आहेत. आज मतदान होत आहे. यानिमित्ताने रोहित पाटील आणि संजय काका पाटील दोघेही एकाच मतदान केंद्रावर आले होते. त्यावेळी त्यांचे समर्थकही त्यांच्या बरोबर होते. तासगाव तालुक्यातील चिंचणी गावातील मतदान केंद्रावर हे दोघेजण एकाच वेळी आले होते. त्यावेळी ते काय करणार याकडे मतदारांचे लक्ष लागले होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रोहित पाटील आणि संजय काका पाटील हे दोघेही तासगाव तालुक्यातील चिंचणी गावातील एकाच मतदान केंद्रावर एकाच वेळी दाखल झाले होते. परंतु रोहित पाटील आणि संजय काका पाटील दोघांनीही एकमेकांच्या समोर येणं कटाक्षाने टाळलं. रोहित पाटील एका गेटने बाहेर पडले. तर संजयकाका पाटील हे दुसऱ्या गेटने बाहेर पडले. दोघेही एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी आल्याने पोलीस मात्र सतर्क झाले होते. निवडणूक प्रचारा दरम्यान या दोघांमध्येही अनेक वेळा संघर्ष झाला होता. 

ट्रेंडिंग बातमी - सोलापुरात 'सांगली पॅटर्न', अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरेंना धक्का; काँग्रेसची अपक्षाला साथ

मतदार संघात माझा विजय निश्चितपणे ठरलेला आहे. तो घासून नाहीतर ठासून होणार आहे. असा विश्वास यावेळी संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला. आता लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतलं आहे. तासगाव कवठेमहांकाळ मधील निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न केला. गेल्या 35 वर्षांमध्ये काम काय केलं हे सांगताना, आल्यामुळे लोकांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतले आहे असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांच्या समर्थकला पोलिसांसमोर धमकी

माझी गुंडगिरी असती तर लोक माझ्यासोबत आले नसते. गुंडगिरी कुणाची आहे, कुणाची बहीण खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी सोबत घेऊन फिरत आहे. हे सर्व लोक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. रोहित पाटील यांच्याकडून प्रचंड पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोपही संजय काका यांनी केला. यावेळी त्यांनी रोहित पाटील यांच्या बहीण स्मिता पाटील यांच्यावरही आरोप केला आहे. या दोघा बहीण भावाने मतदार संघात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं ही ते म्हणाले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com