संकेत कुलकर्णी, पंढरपूर
पुण्यात नाकाबंदीदरम्यान पाच कोटींच्या रोकड सापडली होती. सोमवारी खेड शिवापूर इथं नाकाबंदीवेळी तपासणीत ही रक्कम आढळली होती. हे पाच कोटी रुपये आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी संबंधित असल्याची माहिती समोर येत होती. दरम्यान शहाजी बापू यांच्या कार्यकर्त्याने याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नाकाबंदीदरम्यान सापडलेल्या 5 कोटी रुपयांबाबत बोलताना सांगोला शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी जाहीर सभेत मोठं भाष्य केलं. त्या गाडीची चर्चा करू नका. त्यासाठी ठाण्याची दाढी आमच्यासोबत आहे. असं म्हणत दादासाहेब लवटे यांनी या प्रकरणात थेट ठाण्याचा आशीर्वाद आपल्यासोबत असल्याचे संकेत दिले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?
सांगोला तालुक्यातील चिक महुद या गावात आमदार शहाजी बापू पाटील यांनी हा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी लवटे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य करून या 5 कोटी रुपयांच्या रकमेशी कोणाशी संबंध आहे याचं रोख सांगितला आहे.
ट्रेंडिंग बातमी - सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीची पहिली यादी आली, कोणाला उमेदवारी कोणाला वगळलं?
खेड-शिवापूर टोल नाक्यावर जवळपास 5 कोटी रूपये जप्त करण्यात आले होते. यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. ही रक्कम शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप करण्यात आला होता. संजय राऊत यांनी तर एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले होते. प्रत्येक उमेदवाराला ते 75 कोटी देणार आहेत. त्यातील 15 कोटींचा हा पहिला हफ्ता होता असा आरोपही राऊत यांनी केला होता. दरम्यान हे आरोप शहाजीबापू पाटील यांनी फेटाळले होते.