संकेत कुलकर्णी, सांगोला: शहाजी बापू पाटील अस्सल रांगडा आहे. काय ती भाषा, काय ते डायलॉग, सगळं एकदम ओक्के.बापू बोलायला लागले की भल्याभल्यांची विकेट घेतात, खरंतरं ते आपल्या टीमचे महेंद्रसिंग धोनी आहेत. हा आपला रांगडा गडी आहे, मला सगळं अगदी ओक्के वाटतंय, गेल्यावेळेपेक्षा जास्त गुलाल आणि फटाके आणून ठेवा. २० तारखेला बापूला छप्पर फाड मते मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. सांगोल्यामध्य शहाजी बापू पाटील यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
'सोलापूर सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा. शहाजी बापू विजयाची साखर वाटायला सज्ज आहे. शहाजी बापू सरळ माणूस आहे,छप्पे पंजे येत नाहीत. साध्या सरळ बापूंनी सांगोला तर जिंकलाच पण गुवाहाटीही जिंकली. देश- विदेशात त्यांचे नाव आहे. सिनेमातही बापूच्या कॅरेक्टरला टाळ्या पडतात. गरिबांच्या भल्यासाठी बापूंनी काम केलं. आधीच्या उमेदवारांनी सांगोल्यासाठी काय केलं ते तुम्हाला माहित आहे, मी सांगणार नाही. कामाच्या नावाने बोंब होती. त्यांनी फक्त पाण्याचे राजकारण केले,' अशी टीका यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
नक्की वाचा: 350 कोटी बजेटचा 'कंगुवा'ची जादू पडली फिकी; पहिल्या दिवशीची कमाई किती?
शहाजी बापूंचे कौतुक
'बापूचे काम बोलते, अगोदरच्या मुख्यमंत्र्यांकडे दानत नव्हती, त्याला घ्यायचं माहित होतं द्यायचं माहित नव्हतं. बापुचे काम बोलते म्हणून विरोधकांना पाण्यातही बापू दिसतात. गेल्या दीड वर्षात बापूंनी पाण्यासाठी अनेक कामे केली. बापू कामाला वाघ आहे. बापू वाघासारखे असले तरी त्यांचं काळीज मायाळू हरणासारखं आहे. आम्ही दोन वर्षांपूर्वी जो उठाव केला त्यावेळी बापू विनोद करायचे, हसवायचे. बापू होते म्हणून आमचं एवढं मोठ्ठ मिशन पूर्ण झालं. बापू आता चिंता करु नका, कारण ती जबाबदारी सांगोलाकरांनी घेतली आहे,' असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला.
महत्वाची बातमी: दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती गंभीर, नासाने शेअर केलेल्या फोटोमध्ये काय दिसलं?