मुंबई: राज ठाकरे यांनी एक विषय मांडला तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा. ताबडतोब काही क्षणात उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. तो सुद्ध महाराष्ट्र हितासाठीच होता. यामध्ये अटी शर्थी कुठून आल्या? असे म्हणत आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही जी जानसे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत.. असे सर्वात मोठे विधान संजय राऊत यांनी केले आहे. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले संजय राऊत?
'काही लोकांना भाऊ समविचारे पक्ष एकत्र आलेले नको असतात. त्यामुळे हे असे काटे मारत असतात. राज ठाकरे यांनी एक विषय मांडला तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा. ताबडतोब काही क्षणात उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. तो सुद्ध महाराष्ट्र हितासाठीच होता. यामध्ये अटी शर्थी कुठून आल्या?' असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
'दोन नेते जे भाऊ आहेत ते महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर त्यामध्ये वादविवाद करणे योग्य नाही. त्यात अट अन् शर्थ आहे कुठे? राज ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी, उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्र हितासाठी.. पण या महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युलात भाजप आणि त्यांच्यासोबत असलेले पक्ष बसत नाहीत. ही अट नाही ही लोकभावना आहे त्यामुळे यामध्ये कोणतीही अट किंवा शर्थ नाही..', असेही राऊतांनी स्पष्ट केले आहे.
Unauthorized Schools: अंबरनाथ तालुक्यात 6 अनधिकृत शाळा! शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीर केली यादी, वाचा...
आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही जी जानसे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत. मी माननीय बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेला माणूस आहे, राज ठाकरेंसोबत, राज आणि उद्धव दोघांसोबतही काम केले आहे. आता आम्ही आदित्य ठाकरे राज ठाकरेंसोबत काम करतोय. महाराष्ट्र हीत हेच आमचे ध्येय आहे ज्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली होती... असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, आता जर मतभेद दूर ठेऊन यासंदर्भात काम करणारी लोक एकत्र येणार असतील तर त्यांचे स्वागत.. यामध्ये कोणतीही अट किंवा शर्थ घातलेली नाही. महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या.. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्या पंगतीलाही बसू नका.. अशी भूमिका आहे. यात जर अट किंवा शर्थ वाटत असेल तर राजकारणाचा अभ्यास करावा.. असा सल्लाही राऊतांनी यावेळी दिला.