मुंबई: एकीकडे राज्याच्या राजकारणात महापालिका तसेच स्थानिका स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. दुसरीकडे ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाच्या चर्चाही जोर धरु लागल्या आहेत. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत घातलेली साद त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तात्काळ दिलेला प्रतिसाद यावरुन दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत आता संजय राऊत यांनी सर्वात महत्त्वाचे विधान केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणालेत संजय राऊत?
"आम्ही स्वतः उद्धव ठाकरेसाहेब आणि शिवसेना मनसेसोबत राज ठाकरेंच्या नाते जोडायला आमची नक्कीच सकारात्मक भूमिका ठेवली आहे. कोण काय बोलते यापेक्षा ठाकरे काय बोलतात हे महत्वाचे आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे आणि दोघांवरही जतनेचे प्रेशर आहे. हे प्रेशर जसे भावनिक आहे तसे राजकीय आहे," असे संजय राऊत म्हणालेत.
तसेच "आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही मनसे आणि दिलसे भूमिका आहे. मराठी माणसाचे अहित होता कामा
नये. मराठी माणसाची काही स्वप्न असतील, योजना असतील. त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला मागे हटता कामा नाही. पडदा कधी उघडायचा हे दोन्ही ठाकरे ठरवतील," असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
(नक्की वाचा: Cannes 2025: बनारसी साडी आणि सिंदूर, ऐश्वर्या रायकडून घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम)
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे मन विशाल आणि मोठे आहे. आपण याबाबत सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही अशी उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे भूमिका आहे. राज ठाकरे यांनी मुलाखत दिली म्हणून युतीचा विषय चर्चेत आला असे मी मानत नाही. मुलाखतींवर चर्चा ठरतात का? मुलाखतींवर चर्चा ठरत नाहीत. एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीसही समोर आल्यावर गोड बोलतात मात्र प्रत्यक्षात तसे नाही, असा टोलाही संजय राऊत यांना लगावला.
Amravati Crime: नवरीच्या प्रियकराने दगडाने ठेचलं, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या, अमरावतीत खळबळ