
शुभम बायस्कर, अमरावती: लग्नाच्या दिवशीच वधूच्या प्रियकराने होणाऱ्या नवरदेवाची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. लग्नाच्या दिवशीच नरदेवाची निर्घृण हत्या झाल्याने लग्नघरात शोककळा पसरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की,लग्नाच्या दिवशी वधूच्या प्रियकराने होणाऱ्या भावी पतीचा निर्घृण खून केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. अमरावतीच्या शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील कवठाळ शेतशिवारात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धरयू मोतीलाल उईके (वय 24 वर्ष, रा. पाटणानाका, मध्यप्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे तर दयाराम वरठी (वय 34) वर्ष असं आरोपी प्रियकराचे नाव आहे.
आरोपी दयारामचे मृतक धरयू याच्या नियोजित वधूशी प्रेमसंबंध होते. याच प्रेमप्रकरणातून नवरीच्या प्रियकराने नवरदेवाचा काटा काढा काढण्याचा निर्णय घेतला. सुडाने पेटलेल्या दयारामने लग्नासाठी फटाके आणण्याच्या बहाण्याने नवरेदवाला दुचाकीवर बसवून नेले आणि त्याठिकाणी त्याची निर्घृण हत्या केली तसेच मृतदेह विहिरीत फेकून दिला.
(नक्की वाचा: Cannes 2025: बनारसी साडी आणि सिंदूर, ऐश्वर्या रायकडून घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम)
याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. त्याचबरोबर तपासाची चक्रे फिरवत काही तासांमध्येच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, एकीकडे लग्नाची लगबग सुरु असतानाच नवरदेवाची ्अशी निर्घृण हत्या झाल्याने लग्नघरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नक्की वाचा - EXPLAINER : मे महिन्यातच जून-जुलैसारखा पाऊस का पडतोय? वाचा A to Z माहिती
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world