प्रांजल कुलकर्णी, नाशिक: ऑक्टोबर 2026 मध्ये होणाऱ्या नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील स्नानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी या कुंभमेळ्याकडे लक्ष दिले असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. नाशिकमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले संजय राऊत?
'नाशिकमध्ये मुख्यमंत्री येऊन कुंंभमेळ्याची तयारी करत आहेत. नाशिक शहरामध्ये पाण्याची रस्त्याची अवस्था बघा. लोकांना नगरसेवकही द्यायचे नाहीत ही लोकशाहीची कुठली तरा आहे. नाशिकची कचरापट्टी झाली आहे, रस्त्यांवरील खड्डे बघा. तुम्ही दत्तक घेतलेले हे शहर आहे त्यांच तुम्ही अनाथाश्रम करुन टाकले,' अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
'मुख्यमंत्री दोन दिवस शहरात आहेत. - रात्री गाडी काढून फिरा, प्रत्येक पक्षाचे दोन माजी नगरसेवक सोबत घेऊन फिरा मग समजेल या शहरांची काय अवस्था झाली आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. कुंभमेळ्यात साडेसहा हजार कोटींपैकी किती कोटींचे काम होणार आहे? प्रयागराजमध्ये सर्व गुजराती ठेकेदार होते, नाशिकमध्येही असाच प्रकार आहे, यामध्ये पैशांची कशी लुट होणार आहे, ते तुम्ही पाहाल..', असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
(नक्की वाचा- ST White paper : एसटी महामंडळाकडून 8 दिवसात काढली जाणार श्वेतपत्रिका)
दरम्यान, पालकमंत्र्यांविषयी काही अडलेलं नाही हे मुख्यमंत्री बरोबर बोललेत. राज्यातील मंत्र्यांशिवायही काही अडलेलं नाही कारण मंत्री काम करतच नाहीत. पालकमंत्री हा जिल्ह्याच्या लुटमारीसाठीच नेमला जातो, असे म्हणत संजय राऊत यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुनही महायुतीवर निशाणा साधला.
Solapur News: हगवणेंमुळे गाडीची बदनामी! फॉर्च्युनर मालकाने घेतला असा निर्णय; अख्ख्या जिल्ह्यात होतेय चर्चा