Sanjay Raut: दाऊद इब्राहिम, छोटा शकीलही भाजपमध्ये येणार, प्रचार करणार! संजय राऊतांकडून टीकेचा बाण

दाऊद गँगशी कनेक्शन असलेल्या बडगुजर यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावरुनच संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Sanjay Raut On Sudhakar Badgujar BJP Entry:  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्तासोबत आरोप असलेले ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश झाला. भाजप नेते नितेश राणेंसह देवेंद्र फडणवीस यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावरील आरोपांवरुन विधानसभेत आवाज उठवला होता. आता दाऊद गँगशी कनेक्शन असलेल्या बडगुजर यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावरुनच संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले संजय राऊत?

'भारतीय जनता पक्षाला कोणाला घ्यायचा आहे त्यांचा प्रश्न आहे. शिवसेनेमध्ये कोणाला घ्यायचे आहे तो आमचा प्रश्न आहे. सध्या ठीकठिकाणी पक्षप्रवेश सुरू आहेत. सध्या दाऊद इब्राहिम याला शुद्ध करून पक्षात प्रवेश करून घेण्याची प्रक्रिया सुरू असेल. इकबाल मिरची याला शुद्ध करून घेतलेच आहे. आता दाऊदला घेतील, सलीम कुत्ताला घेतील ही त्यांची विचारधारा आहे," असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 

"दाऊद इब्राहिम कनेक्शन अलकायदा सारखे आरोप करायचे आणि मग त्यांना नंतर पक्षात घ्यायचे. पुढल्या काही काळामध्ये दाऊचे हस्तक देखील घ्यायचे. दाऊद इब्राहिम, छोटा शकील सामील होणार आणि भाजपचा प्रचार करणार आहेत. त्यांच्याकडे गेलेल्या लोकांची यादी माझ्याकडे आहे ते सगळे फिरत्या रंगमंचाचे लोक आहेत. बबनराव घोलप दोन महिन्यापूर्वी शिंदे गटात होते. कधी मनसे कधी राष्ट्रवादी, असा त्यांचा प्रवास आहे.. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. 

ट्रेंडिंग बातमी - 'बायकोला गळ्यातील पोत घ्यायचीये', 93 वर्षांच्या वृद्धाने पिशवीत हात घातला अन्...; अंगावर काटा आणणारा Viral Video


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world