जाहिरात

Sanjay Raut: राष्ट्रवादीच्या आमदाराने शासनाचे हजारो कोटी बुडवले ? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Sanjay Raut Letter To Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस जी, काय सुरू आहे महाराष्ट्रात? थांबवा ही लुटमार!, असं म्हणत राऊत यांनी शेळकेंनी केलेल्या घोटाळ्याचा खुलासा केला आहे.

Sanjay Raut: राष्ट्रवादीच्या आमदाराने शासनाचे हजारो कोटी बुडवले ? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Sanjay Raut On Sunil Shelke: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनी खळबळ उडाली आहे. सुनील शेळके (Sunil Shelke Scam) यांनी  शासनाची कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहले आहे. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, काय सुरू आहे महाराष्ट्रात? थांबवा ही लुटमार!, असं म्हणत राऊत यांनी शेळकेंनी केलेल्या घोटाळ्याचा खुलासा केला आहे.

Political news: उद्धव ठाकरें बरोबर आघाडी करायची की नाही?, दिल्लीतील बैठकीत काय झालं?

काय आहेत संजय राऊत यांचे आरोप? (Sanjay Raut On Sunil Shelke)

सुनील शंकरराव शेळके, आमदार मावळ यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर दगड़ खाणींचे बेकायदेशीर उत्खनन केले आहे, त्याबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी शासनाकडे भरलेली नाही. त्या शेजारी अनेक क्रशर उद्योजकांच्या खाणी आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांनी श्री. सुनील शंकरराव शेळके व त्यांचे बंधू श्री. सुदाम शंकरराव शेळके यांनी दि. ३१/०७/२०२३ रोजी केलेल्या अर्जानुसार संपादन जागेच्या बदल्यात पर्यायी क्षेत्र मिळणेबाबत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे मागणी केलेली होती, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्र्यांना विचारले  सवाल!

1. मा. मुख्यमंत्री महोदय,. सुनील शेळके यांनी उत्खनन केलेल्या क्षेत्रामधील हजारो कोटींची रॉयल्टी बुडविलेली आहे. त्याची भरपाई कशी करणार आहात? त्याबाबत आपल्या मार्फत त्वरित आदेश देण्यात यावेत.
2. भूसंपादन करताना अनेक शेतकऱ्यांची राहती घरे व बागायती जमिनी आपण घेता, त्यांना कधीही आपण बदली जमिनी दिल्या नाहीत, त्यांना हा न्याय का नाही? अशा अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादन रक्कम स्वीकारलेली आहे, ती परत घेऊन त्यांना बदली जमीन देणार का? बदली जमिनीचा न्याय फक्त आमदार या नात्याने श्री. सुनील शेळके व त्यांच्या कुटुंबीयांनाच आहे का? त्यांच्या व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांच्या संपादनामध्ये आलेल्या जमिनी आपण घेतलेल्या नाहीत. हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे? असे सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Assembly News: 'अधिकाऱ्यांना बांधून आणा', मुनगंटीवार भडकले, खोतकर मदतीला धावले, विधानसभेत काय घडलं?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com