'मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण'; 'त्या' बॅगा टार्गेटवर; संजय राऊतांचं धक्कादायक ट्विट

नाशिक मतदारसंघावरुन संजय राऊत यांच्याकडून एकनाथ शिंदेंना वारंवार आरोप केले जात आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

अहमदनगरमधील मविआचे उमेदवार निलेश लंके यांनी मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप केला आणि एक व्हिडिओही शेअर केला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर करीत धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौऱ्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या बॅगेत पैसे असल्याचा आरोप केला आहे. 

संजय राऊतांचं ट्विट
मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस...दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहात आहेत? यातून कोणता माल नाशिकला  पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे. 

Advertisement

नक्की वाचा - 'मुख्यमंत्र्यांची धावपळ नाही तर ही अखेरची फडफड'

Advertisement

12 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यामधील दोघेजण मोठ्या आणि जड बॅगा उचलून घेऊन जात असल्याचं संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावरुन संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना घेतलं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ वाजे मविआमधून तर हेमंत गोडसे महायुतीचे उमेदवार आहेत. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत पोलीस यंत्रणेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलीस इतक्या जड बॅगा घेऊन का जात आहे, निवडणूक आयोगाकडून या बॅगांची तपासणी का केली जात नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.  

Advertisement