
Vaibhavi Deshmukh Result : मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने NEET परीक्षेत 147 मार्क्स मिळवले आहेत. वडिलांच्या निधनानंतर अत्यंत कठीण मानसिक परिस्थितीतही वैभवीने अभ्यासात लक्ष केंद्रित करून आपलं स्वप्न जिवंत ठेवलं.
बारावीच्या परीक्षेत तिने 85.33 टक्के गुण मिळवत आपल्या जिद्दीची झलक दाखवली होती, तर आता NEET सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवून तिने सगळ्यांना आपला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे.
या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) तसंच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत वैभवीचे अभिनंदन केले आहे.
( नक्की वाचा : Raj Thackeray : 'तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं...' तेजस्विनी पंडितच्या राज ठाकरेंना खास शुभेच्छा )
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हीने #NEET परीक्षा उत्तीर्ण केली. तिचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने ही परिक्षा देऊन उत्तम यश संपादन केले. या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!, अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हीने #NEET परीक्षा उत्तीर्ण केली. तिचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने ही परिक्षा देऊन उत्तम यश संपादन केले. या यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा👍🏻 pic.twitter.com/y7DY91w5Zi
— Supriya Sule (@supriya_sule) June 14, 2025
तर, मस्साजोग ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने NEET परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर वैभवीने हे यश संपादन केले आहे. तिच्या या मेहनतीचे व धैर्याचे खरोखरच कौतुक वाटते.
वैभवी, तुला मनःपूर्वक अभिनंदन आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! या शब्दात उदय सामंत यांनी वैभवीचे अभिनंदन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world