Santosh Deshmukh Case : "माझी निर्दोष मुक्तता करा, वाल्मिक कराडची मागणी"; आज कोर्टात काय घडलं?

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड न्यायालयात आज सुनावणी झाली. यानंतर वकील उज्वल निकाल यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Beed Crime : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर सरकारी पक्षाकडून विशेष वकील अॅड उज्वल निकाल यांनी पत्रकारांशी बोलताना आपली बाजू मांडली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आज संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात अनेक घडोमोडी घडल्याचं उज्वल निकम यांनी सांगितलं. दरम्यान आरोपी वाल्मिक कराड याने कोर्टात अर्ज दाखल केल्याचं समोर आलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, मी निर्दोष असल्याने या केसमधून मला डिस्चार्ज देण्यात यावा असा अर्ज वाल्किम कराडने न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे कोर्ट यावर काय निर्णय देणार याकडे लक्ष लागून आले. 

नक्की वाचा - 'पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत जात आहे'; नाशिकमधील निवृत्त शिक्षक दाम्पत्याचा दुर्दैवी शेवट

दुसरीकडे या प्रकरणातील काही आरोपींनी सीआयडीकडून काही कागदपत्रं मागितली आहेत. यामध्ये वाल्मिक कराडचंही नाव आहे. मात्र त्याने मागितलेली कागदपत्र सीलबंध आहेत. त्यामुळे सील उघडल्यानंतर न्यायालयासमोर ती कागदपत्रं दिली जातील असं उज्वल निकल यांनी सांगितलं. आतापर्यंत आरोपीच्या वकिलांनी जी कागदपत्र मागितली होती, ती सर्व देण्यात आली आहे. फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढच्या तारखेला आरोपीच्या वकिलांना दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यंदा वाल्मिक कराडने न्यायालयात आपण निर्दोष असल्याचा अर्ज केला आहे. त्यामुळे यावर पुढील सुनावणी होणार असल्याचं निकमांनी सांगितलं. 

Advertisement

वाल्मिककडून खटल्यातून मुक्त करण्याच्या अर्जावर खुलासा मागितला आहे. त्यामुळे 24 एप्रिलला हा खुलासा सीआयडी तर्फे दाखल करण्यात येईल. त्यानंतर आरोपींवर आरोप निश्चिती करण्याचं काम सुरू होईल. त्यानंतर प्रत्यक्ष पुरावा न्यायालयासमोर सादर केला जाईल, असं निकम यांनी सांगितलं.