Beed News: परळीत काम नको रे बाबा! औष्णिक केंद्रातील कर्मचाऱ्यांनी करुन घेतल्या बदल्या; 150 जणांची उचलबांगडी

राज्यातील प्रमुख औष्णिक विद्युत केंद्रांपैकी एक असलेल्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आल्याचे समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

स्वानंद पाटील, बीड:  बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारी, राखेचे राजकारण अन् गुंडगिरीचे नवनवे अंक समोर येत आहेत. अशातच  राज्यातील प्रमुख औष्णिक विद्युत केंद्रांपैकी एक असलेल्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आल्याचे समोर आले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर परळी थर्मल आणि त्याची राख चांगलीच चर्चेत आली होती.दरम्यान बीडमध्ये काम करणारे लोकं बाहेरील जिल्ह्यात बदल्या करून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामध्ये 10 - 20 नव्हे तर तब्बल 150 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भुसावळ येथे उभारण्यात येत असलेल्या 250 मेगावॅट च्या प्रकल्पासाठी हे कर्मचारी हलवले गेल्याची माहिती आहे.

परळीत सध्या 250 मेगावॉट चे 3 युनिट आहेत. यासाठी तब्बल 900 कर्मचारी या ठिकाणी काम करतात मात्र 750 मेगावॅटचे  संच परळीत असताना देखील अतिरिक्त कर्मचारी असल्याच्या नावाखाली परळीतून दीडशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या या भुसावळ येथे करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये स्वतः बदली अर्ज केलेले १२ जण तर कार्यालयाने बदली केलेले असे एकूण 94 कर्मचारी भुसावळ येथील नवीन प्रकल्पाला हलवलेले आहेत. तर आणखी ५० कर्मचाऱ्यांची बदली प्रस्तावित आहे. इतक्यावरच हे प्रकार थांबणार नसून परळीतील शेकडो कर्मचारी हे इतरत्र हलवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काय आहे थर्मल आणि जिल्ह्याचे समीकरण?

जिल्ह्यासह मराठवाड्यात रोजगाराचे प्रमुख केंद्र म्हणून परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राची ओळख आहे सध्या तिन्ही प्रकल्पामध्ये 900 कर्मचारी काम करतात तर हजारो कामगारांचे हात यावर चालतात. दीडशेवर कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याचं समोर येत असलं तरी आणखी काही कर्मचारी या ठिकाणाहून इतरत्र हलवले जाणार असल्याची माहिती आहे. असे झाल्यास बाजारपेठेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

Advertisement