
प्रशांत जव्हेरी,
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याचा घोडेबाजार देशभरात प्रसिद्ध आहे. 18 डिसेंबरपासून सारंग खेड्यातील चेतक फेस्टिवलला सुरुवात झाली असून देखणे, रुबाबदार अन् लाखो रुपये किमतीचे घोडे सर्वांचे लक्ष वेधत आहेत. सारंगखेडा घोडे बाजारात दाखल झालेला एका रुबाबदार घोडा सध्या चांगलाच भाव खात आहे. या घोड्याची किंमत तुम्ही ऐकून थक्क व्हाल. एक दोन नव्हे तर तब्बल 19 कोटी रुपयांचा हा घोडा सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.
सारंगखेडा घोडे बाजारात दरवर्षी दाखल होणारे विविध जातीचे घोडे हे नेहमीच चर्चेचा विषयही ठरतात. यात सर्वात चर्चा होतेय ती सारंगखेड्याच्या यंदाच्या चेतक फेस्टीवलमध्ये दाखल झालेल्या बिग जास्पर घोड्याची. अहिल्यादेवीनगरच्या राजवीर स्टडफार्म सांभाळ करत असलेला हा घोडा सध्या सर्वाच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. विदेशातून एक दोन आलिशन मोटार येईल यापेक्षाही महागड्या किंमतीच्या बिग जास्परची किंमत आहे ती म्हजे तब्बल 19 कोटी रुपये.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मारवाडी ब्लड लाईनचा असलेला बिग जास्पर हा 68 इंची असून महाराष्ट्रातील सर्वात जास्त उंचीचा घोडा असल्याचा दावा त्यांचे मालक करत आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल आणि संजमसिंग बादल यांच्याकडे सांभाळ झालेल्या बिग जास्परला अहिल्यादवी नगरचे माजी आ. अरुण जगताप व विद्यमान आमदार संग्राम जगताप, सचिन जगताप यांनी खरेदी केलेला आहे. याचे मालक जगताप कुंटूबीय असू सध्या त्याची राखण ही राजवीर स्टड फार्म यांच्याकडून केली जात आहे.
बिग जास्परचे वय 9 वर्ष इतके असून त्याचा रखरखाव हा स्वतंत्र ठेवल्या जातो. त्याची काळजी घेण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल पाच जणांची टिम बनविण्यात आली आहे. तर आरोग्याच्या तपासणी साठीचे वैद्यकीय पथकही वेगळे आहे. बिग जास्परचा आहार देखील साधा असला तरी त्याला रोज जेवणात करड्याची कुट्टी व चन्याचा खूराक आणि सात लिटर दुध दिल्या जाते. त्यामुळेच त्याच्या देखण्या रुपासोबत त्याची ब्रिड गुणवत्ताही उत्तम असल्याने त्याला हिं 19 कोटींची किंमत ठेवली असल्याचे त्याचे मालक सांगतात.
( नक्की वाचा : State Cabinet Portfolio राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणतं खातं कुणाकडं? वाचा सर्व माहिती )
बिग जास्परच्या ब्रिंडींगने पैदास झालेल्या घोड्यांची उंची आणि रुप देखील देखण मिळाले आहे. त्यामुळे उच्च ब्लड लाईनच्या या घोड्याचा चेहरा, कान, मान , पुठ्ठा, सर्वच आकर्षक आहे. सारंगखेड्याचा बाजारात दरवर्षी कोट्यावधी रुपयांचे महागडे घोडे विशेष शो साठी दाखल होतात. मात्र त्यांचे मालक ते घोडे विक्री करत नाही. मात्र घोड्यांच्या चांगला जाणकार आणि ठेवलेली अपेक्षीत किंमत मिळाली तर बिग जास्परची विक्री केल्या जाईल असे त्यांचे मालक सांगतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world