जाहिरात

Bavdhan Bagad: धन्य ते बंधुप्रेम! 16 वर्षांपूर्वी नवस, नाथाचा कौल, कसं असतं बावधनचे बगाड? 300 वर्षांची परंपरा

Bavdhan Bagad Yatra 2026: 300 वर्षांचा इतिहास असलेली ही यात्रा म्हणजे गावकऱ्यांची एकी, भक्ती अन् समृद्ध संस्कृतीचा संगम आहे. भैरवनाथाचा विवाह सोहळा, छबिना, मिरवणूक आणि पारंपरिक बगाड हे या यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. 

Bavdhan Bagad: धन्य ते बंधुप्रेम! 16 वर्षांपूर्वी नवस, नाथाचा कौल, कसं असतं बावधनचे बगाड? 300 वर्षांची परंपरा

Satara Bavdhan Bagad Yatra 2026:  महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून सातारा जिल्ह्यातील बावधनचं बगाड प्रसिद्ध आहे. काशीनाथाचं चांगभलं म्हणत वाई तालुक्यातील बावधन येथील प्रसिद्ध बगाड यात्रा आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. गुलालाची उधळण करत भैरवनाथाच्या नावानं चांगभलंचा गजर करत भाविकांनी बगाडाचे दर्शन घेत भक्तिभावाने नवस फेडले. तब्बल 300 वर्षांचा इतिहास असलेली ही यात्रा म्हणजे गावकऱ्यांची एकी, भक्ती अन् समृद्ध संस्कृतीचा संगम आहे. भैरवनाथाचा विवाह सोहळा, छबिना, मिरवणूक आणि पारंपरिक बगाड हे या यात्रेचे प्रमुख आकर्षण असते. 

कसा ठरतो बगाड्या? 

नवस एकाचा अन् तो पूर्ण करण्यासाठीचा सोहळा संपूर्ण गावाचा असंच या बावधनच्या बगाडाबाबत म्हणता येईल. कारण भाविकांनी देवाला केलेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी ही बगाड यात्रेची परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्रीनंतर मंदिरातील पुजारी पारंपरिक पद्धतीने देवाला कौल लावून बगाड ठरवतात. रात्री बारा वाजता बावधन च्या श्री काळभैरवनाथ मंदिरात मध्यरात्री सर्व बावधनकर भक्तगण एकत्र जमतात. वातावरणात दैवी शांतता असते.

Nashik News: डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट! पतीचे विवाहबाह्य संबंध, छळ.. नेमकं काय घडलं?

ज्यांनी ज्यांनी नाथांना नवस केलेला असतो, ते सर्व भाविक देवासमोर ओळीने कौलासाठी बसतात. देवांचे पुजारी प्रत्येक नवसकर्त्याच्या नावाने नाथांना कौल लावतात. प्रत्येकाच्या नावाचा पुकारा होतो आणि क्षणभर संपूर्ण परिसरात शांतता पसरते. देवाचे पुजारी सर्व नवसकऱ्यांना रांगेत बसवतात. 50 लोकांचे पाच- पाच गहू लावले जातात. उजवा आणि डावा असे गहू लावले जातात. डावा कौल म्हणजे बगाड नाही आणि उजवा कौल म्हणजे बगाडाचा मानकरी.

देवांचा कौल मिळताच काशीनाथाचे चांगभले!” या जयघोषाने आसमंत दुमदुमतो. नाथांचा उजवा प्रसाद ज्याला लाभतो, त्याची त्या वर्षीच्या बगाड्या म्हणून निवड केली जाते. हा मान म्हणजे केवळ सन्मान नव्हे, तर नाथांच्या कृपेची आणि श्रद्धेची पावतीच असते. यावर्षी नवस फेडण्यासाठी एकूण ६१ नवसकरी बसले होते. त्यापैकी ३७व्या क्रमांकावर असलेल्या विठ्ठल सोपान कदम यांच्या बाजूने देवाचा कौल लागल्याने त्यांना बगाड होण्याचा मान मिळाला. 

भावाच्या प्रकृतीसाठी केलेला नवस!

विठ्ठल सोपान कदम यांनी 2010 मध्ये आपल्या भावाच्या प्रकृतीसाठी काशीनाथाकडे नवस केला होता. २०१० मध्ये विठ्ठल कदम यांचे बंधु श्री रविंद्र सोपान कदम यांची प्रकृती बिघडली होती, त्यांची प्रकृती बरी होऊ दे यासाठी त्यांनी साकडं घातले होते. २०१० पासून तब्बल 16 वर्ष ते नवस फेडण्यासाठी कौल लावत होते, यंदा त्यांना हा मान मिळाला. ही निवड म्हणजे भक्तीची परीक्षा, श्रद्धेचा विजय आणि साक्षात शक्तीचा आशीर्वाद! योगा योगाची बाब म्हणजे श्री विठ्ठल कदम यांचे बंधू रवींद्र कदम यांनासुद्धा यापूर्वी बगाड्या होण्याचा मान मिळालेला होता.

सुमारे १६ वर्षापूर्वी बंधू श्री रविंद्र सोपान कदम आजारी असल्याने त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी नाथांना नवस केला होता तो नवस पूर्णत्वास गेला .
ही निवड म्हणजे भक्तीची परीक्षा, श्रद्धेचा विजय आणि साक्षात शक्तीचा आशीर्वाद! योगा योगाची बाब म्हणजे श्री विठ्ठल कदम यांचे बंधू रवींद्र कदम यांनासुद्धा यापूर्वी बगाड्या होण्याचा मान मिळालेला होता.

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या अपघात किंवा घातपाताला कोण कारणीभूत? रोहित पवारांनी ट्वीटरवर नावंच जाहीर केलं

 बगाड म्हणजे काय ?

बगाड हा मोठा गाडा असतो, ज्याचे वजन सुमारे २ ते ३ टन असते. त्याची रचना - दांडी चौके, कणा, बूट, सांडी, वास, खांब, शिड अशी असते. शिडाला नवसाचा बागड्या बांधलेला असतो. नवस पूर्ण झालेल्या व्यक्तीला बागड्या म्हणून निवडले जाते. बगाडाच्या रथाला दोन मोठी दगडी चाके असतात. दहा फूट लांबीच्या कण्यावर सुमारे १८ फूट उंच वाघाचे तोंड असलेला खांब बसवला जातो. त्यावर सुमारे ४० फूट उंचीचे बांबूचे शीड विशिष्ट कोनात बांधले जाते.  शिडाच्या टोकाला झोपाळ्यासारखी व्यवस्था असते आणि त्यावर लोखंडी गळ्यातून बगाड्याला टांगले जाते. 

बैलजोडीच्या साहाय्याने हा रथ गावातून फिरवला जातो. गावातील सुतारांनी पारंपरिक कौशल्याने हा बगाड तयार केला. अनेक वर्षांची बावधनच्या बगाड यात्रेची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने अखंडितपणे सुरू आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही दैवी परंपरा गावाच्या एकजुटीचे, विश्वासाचे आणि अध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com