जाहिरात

Nashik News: डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट! पतीचे विवाहबाह्य संबंध, छळ.. नेमकं काय घडलं?

निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध होते, त्यांच्याकडून माझ्या बहिणीचा छळ केला जात होता असा खळबळजनक आरोप मनीषा जेजुरकर यांच्या भावाने केला आहे. 

Nashik News: डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट! पतीचे विवाहबाह्य संबंध, छळ.. नेमकं काय घडलं?

राहुल वाघ, नाशिक:

Nashik Dr Manisha jejurkar Death Case:  नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (ता. 6 मार्च) सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवले. या आत्महत्या प्रकरणामागे नेमकं काय कारण असावे? याचा तपास सुरु असतानाच एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. मनीषा जेजुरकर यांच्या कुटुंबियांनी त्यांचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमधील आयुर्वेदिक डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूमागे पती निलेश जेजुरकर असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून काम करणारे निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध होते, त्यांच्याकडून माझ्या बहिणीचा छळ केला जात होता असा खळबळजनक आरोप मनीषा जेजुरकर यांच्या भावाने केला आहे. 

PMPML Free Bus Ride: पुण्यातील लाडक्या बहि‍णींना गिफ्ट! PMP बसने दिवसभर मोफत फिरा; 'या' 31 मार्गांवर खास सेवा

गेल्या दीड वर्षांपासून डॉ. मनीषा जेजुरकर यांना मानसिक अत्याचाराचा सामना करावा लागत होता.  गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही निलेश जेजुरकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करत आहोत. याप्रकरणी डॉ. निलेश दत्तात्रय जेजुरकर यांची सखोल चौकशी व्हावी, आमच्या ताईला न्याय मिळावा, अशी मागणी जेजुरकर यांच्या कुटुंबियांनी केली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात नातेवाईकांकडून तक्रार दाखल केली असून पती निलेश जेजुरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. 

दरम्यान, डॉ. मनीषा जेजुरकर या आयुर्वेदिक सल्लागार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांचे सर्वम आयुर्वेद बहु-विशेषज्ञता आणि पंचकर्म केंद्र नाशिक शहरात आहे. तर त्यांचे पती निलेश जेजुरकर नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. आयुर्वेदिक उपचार, समुपदेशन आणि वैकल्पिक चिकित्सेच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्य लाभ देणाऱ्या जेजुरकर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या अपघात किंवा घातपाताला कोण कारणीभूत? रोहित पवारांनी ट्वीटरवर नावंच जाहीर केलं

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com