जाहिरात

Satara Crime News : फक्त दोन शब्द खटकले, मुलाने जन्मदात्या आईला क्रूरपणे संपवलं 

Son Killed Mother : दारुच्या नशेत त्याने आईवर हात उचलला. घरात असलेला पाण्याचा हंडा घेऊन आईच्या डोक्यावर त्याने जोरदार सलग प्रहार केले. प्रहार एवढे जोरात होते की त्यात संगीता जाधव यांचा मृत्यू झाला. 

Satara Crime News : फक्त दोन शब्द खटकले, मुलाने जन्मदात्या आईला क्रूरपणे संपवलं 

सुजीत आंबेकर, सातारा

मुलानेच जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. साताऱ्यातील माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे ही घटना घडली आहे. विशाल जाधव (34 वर्ष) असं आरोपी मुलाचं नाव आहे. तर संगीता जाधव (48) मृत आईचं नाव आहेत. पोलिसांना आरोपीला अटक केली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, विशालला दारुचं व्यवस होत. तो रोज दारू पिऊन घरी यायचा. शुक्रवारी रात्री देखील तो दारू पिऊनच घरी आला होता. पावणे दहा वाजण्याच्या सुमारास त्याने घरी येऊन आईला जेवायला मागितले. आई त्यावेळी झोपली होती, म्हणून आईने त्याला हाताने घेऊन खा, असे सांगितले. आई असं म्हणताच डोक्यात नशा असलेल्या विशालने आईसोबत भांडायला सुरुवात केली.

(नक्की वाचा- Nagpur News: लग्नाच्या वाढदिवशीत दाम्पत्याने संपवलं जीवन, सुसाईड नोट वाचून सर्वच सून्न झाले)

यावेळी दारुच्या नशेत त्याने आईवर हात उचलला. घरात असलेला पाण्याचा हंडा घेऊन आईच्या डोक्यावर त्याने जोरदार सलग प्रहार केले. प्रहार एवढे जोरात होते की त्यात संगीता जाधव यांचा मृत्यू झाला. 

(नक्की वाचा - Crime News : 550 किमी लांबून यायचे अन् पोलिसांची डोकेदुखी वाढवायचे; दोघांना अटक)

घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी झालेल्या संगीता यांना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचासाठी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयातून त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र सातारा येथे संगीता यांना मृत घोषित करण्यात आले. दहिवडी पोलिसांनी आरोपी विशाल याला तासाभरातच अटक केली. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com