Satara Doctor Suicide Case News: फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. आत्महत्येआधी डॉक्टर तरुणीने हातावर सुसाईड नोट लिहित पोलीस अधिकाऱ्यासह प्रशांत बनकर या इंजिनिअर तरुणावर गंभीर आरोप केले आहेत. यापैक प्रशांत बनकर या पीडित डॉक्टर मुलगी राहत असलेल्या बिल्डिंग मालकाला अटक करण्यात आली आहे. प्रशांत बनकरला अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी खळबळजनक दावा केला आहे. (Phaltan Doctor Death Case Update)
प्रशांत बनकरच्या बहिणीचा सर्वात मोठा दावा!
पिडीत डॉक्टर तरुणी राहत असलेल्या बिल्डिंग मालकाचा मुलगा प्रशांत बनकर (Prashant Bankar) याला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी या प्रकरणी खळबळजनक दावा केला आहे. या प्रकरणात प्रशांत बनकरला अडकवण्यात येत आहे, असा दावा त्याच्या बहिणीने केला आहे. डॉक्टर तरुणीचे आणि आमच्या कुटुंबियांचे घरचे संबंध होते, मात्र भाऊ प्रशांत बनकर याची १५ दिवसांपूर्वीच ओळख झाली होती. स्वत: डॉक्टर ,तरुणीनेच प्रशांत बनकरला प्रपोज केला होता, असा दावा त्याच्या बहिणीने केला आहे.
15 दिवसांपूर्वीच झालेली ओळख..
काही महिन्यांपूर्वी प्रशांत आजारी पडला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचारादरम्यान पिडीत डॉक्टर तरुणीशी त्याच्याशी ओळख झाली. डॉक्टर तरुणीनेच त्याचा नंबर घेतला. त्याला पहिल्यांदा प्रपोजही त्यांनीच केले, मात्र प्रशांतने नकार दिला. त्यानंतरही प्रशांतशी त्या संपर्क साधत होत्या. माझ्या भावाने तिला समजावून सांगितलं होते, त्यानंतर तो विषय तिथेच क्लोज झाला होता. पण डॉक्टर तरुणीच प्रशांतला टॉर्चर करत होती, असा खळबळजनक दावा प्रशांत बनकरच्या बहिणीने केला आहे.
डॉक्टर तरुणी तणावात होती....
'महिला डॉक्टर नेहमी आमच्या घरी यायच्या. जॉबमध्ये सुरु असलेल्या त्रासाबाबतही सांगायच्या. गेल्या काही दिवसांपासून त्या मानसिक त्रास सुरु असल्याचं दिसायचे. त्या नेहमी टेंन्शनमध्ये असायचे. बोलण्यातून त्यांनी अनेकदा मी टेन्शनमध्ये असल्याचे सांगितले. मात्र त्याचे कारण आम्हाला माहित नव्हते. माझ्या भावाशी आणि त्यांचे संबंध नव्हते, आम्ही त्यांची घरच्यांसारखी काळजी घेतली, असंही बनकर कुटुंबाने म्हटले आहे.
Tulja Bhavani Mandir: भाविकांनी लक्ष द्या! तुळजाभवानीचे मुख्य प्रवेशद्वार बंद, गर्दीमुळे मोठा निर्णय
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world