जाहिरात

' महिला डॉक्टरला फोन केला..', रणजितसिंह निंबाळकर यांची मोठी प्रतिक्रिया, आत्महत्या प्रकरणी खुलासा

 Ranjitsinh Naik Nimbalkar On Doctor Suicide Case:  राजकारणातून ही नावे देण्यात आली आहेत. अनेकवेळा डॉक्टरांशी माझे बोलणे होत असते. डॉक्टर, सीईओ यांच्याशी रोजच बोलणे होत असते.

' महिला डॉक्टरला फोन केला..', रणजितसिंह निंबाळकर यांची मोठी प्रतिक्रिया, आत्महत्या प्रकरणी खुलासा

 Ranjitsinh Naik Nimbalkar On Doctor Suicide Case:  पोलिस आणि राजकारणांच्या त्रासाला कंटाळून फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने जीव दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणात नवनवे खुलासे होत असून तक्रारीमध्ये खासदारांसह त्यांच्या पीएंचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप  नेते, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव घेतले आहे. या गंभीर आरोपांवर आता रणजितसिंह निंबाळकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

काय म्हणाले रणजितसिंह निंबाळकर? 

 याबाबत बोलताना रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की,  "डॉक्टरांची तक्रार वाचली, त्यांच्या तक्रारीच्या चौकशीची अहवालही आपण वाचला. यामध्ये सखोल तपास होणे गरजेचे आहे. कुणावरही अन्याय झाला तर आपण पोलिसांना फोन करतो, लोकप्रतिनिधींचे ते कामच आहे. राजेश शिंदे आणि रोहित नागठिळे.. ही नावे फलटणकरांनी (रामराजे निंबाळकर) त्यांना दिलेली दिसत आहेत. काल दोन वेगळीच नावे होती. राजकारणातून ही नावे देण्यात आली आहेत. अनेकवेळा डॉक्टरांशी माझे बोलणे होत असते. डॉक्टर, सीईओ यांच्याशी रोजच बोलणे होत असते.

EXCLUSIVE: प्रपोज, सहकुटुंब देवदर्शन, धक्कादायक LOVE अँगल? डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येत नवा ट्वीस्ट!

तसेच "त्यामध्ये कुठेही खासदारांनी दबाव आणला, दमदाटी केली असा कुठेही उल्लेख नाही. कदाचित मी फोन केला त्याला सहा महिने झाले असावेत. मला हे माहिती नाहीत. एवढे फोन आपण करतो, मी त्यांना फोन केला असेल किंवा केलाही नसेल. यापैकी राजेश शिंदे हा पीए माझ्याकडे आहे. मात्र डॉक्टरांच्या फिर्यादीत कुठेही आमचा उल्लेख नाही, नावाचा उल्लेख नाही. दमदाटी केल्याचाही उल्लेख केला नाही, मात्र राजकीय वैमनस्यातून या नावाचा संदर्भ जोडण्यात आला, आत्महत्येशी याचा काहीही संबंध नाही'," असं रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितले. 

निंबाळकर यांचा संबंध कसा?

रणजितसिंह निंबाळकर यांचे साखर कारखाने आहेत,  त्यांनी बीड जिल्ह्यातील ऊसतोड मुकादमांना उचली दिल्या होत्या. याप्रकरणात फसवणूक झाल्यानंतर त्यांनी मुकादमांना अटक करुन आणा, असे आदेश पोलिसांना दिले होते. मात्र  अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाली आहे. ५००, ६०० हून जास्त गुन्हेगार आहेत. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यासाठी फोन करण्याचा माझा काही संबंध नाही, असेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 

Phaltan Doctor Case: 5 महिन्यांपासून छळ, अखेर दुर्दैवी अंत! डॉक्टर तरुणीसोबत काय काय घडलं? A टू Z स्टोरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com