पुणे: 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यंदा साताऱ्याला मिळाला आहे. तब्बल 32 वर्षानंतर राजधानी साताऱ्यामध्ये मराठी साहित्य संमेलन होत असून साताऱ्यामधील मराठी साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाऊंडेशनला ही जबाबदारी मिळाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये 99 वे मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यामध्ये भरवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलींद जोशी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निवडण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती.
या समितीने पाच, सहा आणि 7 जून रोजी निमंत्रक संस्थांना भेट दिली. यापैकी साताऱ्यातील शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाऊंडेशनला यंदाचे संमेलन आयोजित करण्याची संधी देण्यात आली आहे. साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियमवर हे मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. हे स्टेडियम सातारा बस स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर आहे.
नक्की वाचा - Godavari River : तेलंगणाच्या सीमेवरील धरणात सहा मुलं बुडाली, नदीच्या किनाऱ्यावर कुटुंबीयांचा आक्रोश
दरम्यान, तब्बल 32 वर्षानंतर साताऱ्यामध्ये मराठी सााहित्य संमेलन भरणार आहे. याआधी 1993 साली साताऱ्यामध्ये मराठी साहित्य संमेलन भरले होते. आता 32 वर्षांनी चौथ्यांदा साताऱ्याला हा मान मिळाला आहे. 1905 साली रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते. 1962 मध्ये 44 वे तर 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले होते.
Nilesh Rane: 'नितेशने जपून बोलावं, सगळ्या गोष्टींचे भान ठेवून...' निलेश राणेंचा भावाला सल्ला