राहुल तपासे, सातारा:
Satara Student Death News: नीट पेपर फुटीप्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. नीट पेपर लीक प्रकरणाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. देशभरात नीटचे पेपर फुटल्याने तसेच परीक्षेमधील अपयशाने अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. सातारा जिल्ह्यातून अशीच दुर्दैवी घटना समोर आली आहे. नीट परिक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून साताऱ्यातील कराड तालुक्यात विद्यार्थीनीने मृत्यूला कवटाळल्याची घटना घडली आहे.
Instagram Ban: भारतात 25 ऑगस्टच्या रात्रीपासून Instagram बंद? पोस्टने खळबळ, सरकारकडून मोठी अपडेट
नीटमधील अपयशाने खचली, समीक्षाने मृत्यूला कवटाळलं!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कराड तालुक्यातील शेरे येथील समीक्षा दीपक पवार वय-18 हिने नीट (NEET) परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. समीक्षाला कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर सोमवारी तिचा मृत्यू झाला. समक्षाने गेल्या वर्षीची नीट परीक्षा तिने दिली होती.
निकालात अपयश आल्याने ती मानसिक तणाव आणि नैराश्यात होती. त्याच अवस्थेत तिने २३ जुलै रोजी उंदरांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी वड्या खाल्ल्या. मात्र, ही बाब तिने सुरुवातीला घरातील कोणालाही सांगितली नव्हती. त्यानंतर दोन दिवसांनी विषाचा परिणाम शरीरावर होऊ लागल्याने तिला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यावेळी तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने २६ जुलै रोजी तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी तिची प्राणज्योत मालवली. स्पर्धा परीक्षांतील अपयशामुळे विद्यार्थ्यांवर वाढत असलेल्या मानसिक ताणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मसूर पोलीस करीत आहेत.
Pune News: कृपया लक्ष द्या! दिवे घाट राहणार बंद; कधी अन् किती वेळ? जाणून घ्या पर्यायी मार्ग